मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव सुरू, ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलावही सुरू

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव सुरू, ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलावही सुरू

सरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय.

सरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय.

सरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय.

पुढे वाचा ...
रोहिणी गोसावी, प्रतिनिधी 14 नोव्हेंबर, मुंबई : सरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. कारण लिलाव होताना या तीनही पद्धतींमधून ज्याची बोली जास्त आहे त्याच व्यक्तीला ही संपत्ती मिळणार आहे. दाऊदच्या मुंबईतल्या जप्त केलेल्या 10 जागांपैकी भेंडी बाजार भागातील तीन जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठीची बोली ऑनलाईन पद्धतीनं लावण्यात आलीये. कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडून दाऊद भारतातून पळून गेला. तस्करी आणि परकीय चलन हाताळणी अधिनियम 1 976 अंतर्गत दाऊदशी संबंधीत असलेली देशभरातली संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याआधीही दोन वेळा दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आलाय. दाऊदच्या ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे त्यात हॉटेल रौनक अफरोज म्हणजेच आत्ताचं हॉटेल जायका, डामरवाला बिल्डिंगमधले रुम नंबर 18 ते 20, 25, 26 आणि 28, आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा समावेश आहे. यातल्या डामरवाला बिल्डिंगमध्ये गेला काही काळ दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रहात होता. पण या इमारतीच्या बाजूची इमारत कोसळल्यानं इक्बाल कासकरनं त्याचं बिऱ्हाड तिथून हलवलं होतं. या आधी दिल्लीचे वकिल अजय श्रीवास्तव यांनी 2011 मध्ये दाऊदची ताडदेव इथली संपत्ती विकत घेतलीये. पण त्यानंतर संप्ततीचा ताबा घेण्यासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या लिलावात ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन यांनीही हॉटेल रौनक अफरोजसाठी सर्वात जास्त बोली लावली होती, 30 लाखाची अनामत रक्कम भरल्यानंतर मात्र राहिलेली रक्कम भरु न शकल्यानं त्यांना ती संपत्ती सोडून द्यावी लागली. यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभा हॉटेल रौनक अफरोजसाठी बोली लावणार आहे. या हॉटेलच्या जागेवर स्वच्छतागृह बांधण्याचा मानस अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी नुकताच मुंबईत बोलून दाखवला होता. याआधी स्वामी चक्रपणी यांनी दाऊदची कार लिलावतून खरेदी केली होती. खरेदी केल्यानंतर त्यांनी ती जाळून टाकली. दाऊदची संपत्ती लिलावातून विकत घेतल्यानंतर तिचा प्रत्यक्ष ताबा मिळवणं हे म्हणावं तितकं सोपं काम नाहीये. कारण ही संपत्ती खरेदी करणाऱ्या खरेदिदाराला दाऊदचे नातेवाईक त्या संपत्तीपर्यंत पोहोचू देत नाहीत. अजय श्रीवास्तव यांना ताडदेवमधली मालमत्ता मिळवण्यासाठी लिलावानंतर हसीना पारकरच्या विरोधात मोठी कायदेशिर लढाईही लढावी लागल होती. पण आता परिस्थिती थोडी बदललीये. हसीना पारकरचा मृत्यू झालाय. तिच्यानंतर दाऊदचा व्यवसाय सांभाळणारा त्याचा भाऊ इक्बाल कासकर जेलमध्ये आहे. त्यामुळं या वेळी दाऊदची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना या वेळी तरी सपत्तीचा ताबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. दाऊदची लिलाव करण्यात येणारी संपत्ती :- मालमत्ता                                                                                                        किंमत                                                                           अनामत रक्कम हॉटेल दिल्ली जायका                                                                              1 कोटी 18 लाख 63 हजार                                                   23 लाख 72 हजार 800 डामरवाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर 18 ते 20, 25, 26 आणि 28       1 कोटी 55 लाख 76 हजार                                                   62 लाख 30 हजार 400 शबनम गेस्ट हाऊस                                                                               1 कोटी 21 लाख 43 हजार                                                   48 लाख 57 हजार 200
First published:

Tags: दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या