दाऊदने पोलीस आणि नेत्यांना एकत्र घेऊन माझ्याविरोधात षडयंत्र रचलं -छोटा राजन

मी पत्रकार जे डेला मारलं हे खोट आहे असाही दावा छोटा राजननं मकोका कोर्टात केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2018 11:38 PM IST

दाऊदने पोलीस आणि नेत्यांना एकत्र घेऊन माझ्याविरोधात षडयंत्र रचलं -छोटा राजन

29 जानेवारी : माझ्या विरोधात दाऊद इब्राहिम, पोलीस अधिकारी आणि नेतेमंडळींनी मिळून संगनमतानं षडयंत्र केल्याचा आरोप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं मकोका कोर्टात केलाय. तसंच आपल्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्याचाही दावा छोटा राजनने केला आहे. तसंच, मी पत्रकार जे डेला मारलं हे खोट आहे असाही दावा छोटा राजननं मकोका कोर्टात केलाय.

साल २०११ मध्ये झालेल्या ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या खटल्यात छोटा राजनचा व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात आला. साल १९९३ पर्यंत आपल्यावर एकही केस दाखल नव्हती. मात्र दाऊद गँगशी फारकत घेतल्यानंतर आपल्याविरोधात दाऊद, पोलीस आणि भारतातील नेतेमंडळींनी हातमिळवणी करून खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोप छोटा राजननं केलाय.

सध्या पोलीस आपल्याविरोधात दाखल ज्या केसेसची माहिती देतायत त्यातील पीडितांना आपण ओळखतही नसल्याचं त्यानं म्हटलंय. यावर मग तुमच्यावर साक्षीदार आरोप का करतायंत असा सवाल मकोका कोर्टाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी करताच, त्यांना पोलिसांची फूस आहे असा आरोप छोटा राजनकडून करण्यात आला.

२५ ऑक्टोबर २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आलंय. तेव्हापासून तो तिहार जेलमध्ये सुरक्षित ठिकाणी कैद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 11:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close