दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला कोठडी, देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता

डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान कासकर याला मुंबई कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणी वसूली प्रकरणात रिझवानला खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:43 PM IST

दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला कोठडी,  देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता

मुंबई, 5 ऑगस्ट- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान कासकर याला मुंबई कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणी वसूली प्रकरणात रिझवानला खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला मोक्काही लावण्यात आला होता.

देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता...

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने रिझवानला जुलै महिन्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिझवानला अटक केली होती. तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. नंतर त्याची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आली होती.

दरम्यान, यापूर्वी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अहमद रझा वडारिया याला अटक केली होती. वडारिया हा दाऊद टोळीचा हस्तक फहिम मचमचचा हस्तक आहे. वडारियाच्या चौकशीत रिझवानचे नाव समोर आले होते. वडारियाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि रिझवानला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तो अटकेच्या भीतीने तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल असल्याने त्याला मोक्काही लावण्यात आला आहे. रिझवानचा बाप इक्बाल कासकर याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

काय हे प्रकरण?

Loading...

मुंबईतील दोन व्यापाऱ्यांमध्ये एक व्यवहार झाला होता. ज्यामध्ये पैशाची मोठी देवाणघेवाण देखील झाली होती. पण यातील एक व्यापाऱ्याने घेतलेले पैसे दुसऱ्या व्यापाऱ्यास नकार दिला. तसेच त्याने याबाबत थेट दुबईला जाऊन डी कंपनीच्या माणसांची मदत घेतली. यानंतर फहीम मचमच या दाऊदच्या हस्तकाने यात मध्यस्थी केली. दुसरीकडे दाऊदचा पुतण्या यानेही या व्यापाऱ्याला धमकी दिली. 'तुझे पैसे आता विसर, ते पैसे आता आमचे आहेत.' असे म्हणत या व्यापाऱ्याला रिझवानने धमकी दिली.

SPECIAL REPORT : 70 वर्षांची भळभळती जखम अखेर भरली, मोदी-शहांनी असं फत्ते केलं 'मिशन जम्मू-काश्मीर'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...