प्रदीप शर्मा 'बॅक इन अॅक्शन', दाऊदचा भाऊ इक्बालच्या मुसक्या आवळल्या

प्रदीप शर्मा 'बॅक इन अॅक्शन', दाऊदचा भाऊ इक्बालच्या मुसक्या आवळल्या

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरला अटक करण्यात आलीये. प्रदीप शर्मांच्या नेतृत्वाखाली इक्बाल कासकरला अटक करण्यात आलीये

  • Share this:

18 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरला अटक करण्यात आलीये. प्रदीप शर्मांच्या नेतृत्वाखाली इक्बाल कासकरला अटक करण्यात आलीये. इक्बालने बिल्डराकडून खंडणी वसूल करण्यासाठी जीवेमारण्याची धमकी दिली होती.

दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ इक्बाल कासकरला  ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी नागपाडामध्ये अटक करण्यात आलीये. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केलीये.

इक्बालने ठाण्यात प्रसिद्ध बिल्डरला धमकी देऊन फ्लॅट बळकावला होता. त्यानंतरही इक्बालने बिल्डराकडून पैशाची मागणी सुरूच ठेवली होती. अखेर बिल्डराने वैतागुण पोलिसांकडे धाव घेतलीये. आज संध्याकाळी प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे खंडणीविरोधी पथकाने इक्बालच्या घरी जाऊन मुसक्या आवळल्या. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात नेल्याचे समजते.

विशेष म्हणजे, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात दाखल झाले. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली मोठी कारवाई होती.

First published: September 18, 2017, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading