मुंबई, 23 जून: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे.
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करतील.
Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar has been taken into custody by NCB in a drugs case: NCB
गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करुन ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचं एनसीबीच्या लक्षात आलं. त्यानंतर आता एनसीबीने ही कारवाई केली आहे.
काल मुंबईत कोट्यावधींचा ड्रग्ज साठा जप्त
मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी करावाई केल्या आहेत. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.