S M L

दाऊद पाकमध्ये सारखी घरं बदलतो, त्याचे एकूण 4 पत्ते ; इक्बालची कबुली

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे, याची कबुली खुद्द दाऊदचाच भाऊ इक्बाल कासकरनंच दिलीये.

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2017 08:56 PM IST

दाऊद पाकमध्ये सारखी घरं बदलतो, त्याचे एकूण 4 पत्ते ; इक्बालची कबुली

21 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे, याची कबुली खुद्द दाऊदचाच भाऊ इक्बाल कासकरनंच दिलीये. एवढंच नाहीतर त्याने दाऊदचे चार पत्तेही दिले आहे.

ठाण्यात बिल्डराला खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इक्बाल कासकरला अटक करण्यात आलीये. चौकशी दरम्यान इक्बालने दाऊदचा पाकिस्तानातील पत्ता दिलाय.

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यानं हे कबूल केलं. २०१४ पासून माझ्या दाऊदशी संबंध नाही, पण तो पाकमध्येच लपून बसलाय. तो वारंवार घरं बदलत असतो, असं सांगत इक्बालनं दाऊदचे पाकमधले ४ पत्ते दिले.

गुप्तचर विभागानं इक्बालची आज ठाण्यात ४ तास चौकशी केली. त्याआधी ठाणे पोलीस आयुक्त परंबीर सिंग यांनीही इक्बालची चौकशी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 08:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close