सुनेने फोडला वासनांध सासऱ्याच्या पापाचा घडा.. मोबाइलमध्ये कैद केले कृत्य

विरारमध्ये एका वासनांध सासऱ्याच्या पापाचा घडा त्याच्या सुनेनेच फोडला. नराधम सासऱ्याचे कृत्ये मोबाइलच्या कॅमेरात कैद करून त्याचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:52 PM IST

सुनेने फोडला वासनांध सासऱ्याच्या पापाचा घडा.. मोबाइलमध्ये कैद केले कृत्य

मुंबई, 1 ऑगस्ट- विरारमध्ये एका वासनांध सासऱ्याच्या पापाचा घडा त्याच्या सुनेनेच फोडला. नराधम सासऱ्याचे कृत्ये मोबाइलच्या कॅमेरात कैद करून त्याचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण घरच्या घरी मिटवायला हवे होते, असा अजब सल्ला दिल्याने पोलीस कायद्याचे रक्षक की भक्षक हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय आहे हे प्रकरण?

विरारमध्ये सासरा आणि सुनेच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. गेल्या एक आठवड्यापासून नराधम सासरा सुनेसोबत लगट करीत होता. याची तक्रार तिने पतीकडे केली. मात्र, सर्वांनी तिला खोटे ठरवले. मात्र पीडितेने सासऱ्याला धडा शिकवण्याची निर्धार केला. तिने मोठ्या हिंमतीने सासऱ्याचे कृत्ये मोबाइलच्या कॅमेरात कैद करून घटनेचा पर्दाफाश केला. गोविंद शेलार असे आरोपीचे नाव आहे. त्याला विरार पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे

करत आहेत. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. तरंच अशा अनेक पीडित महिला-मुली तक्रार करायला पुढे सरसावतील आणि नराधमाना शिक्षा होईल. दरम्यान, अनेक महिला आपल्याच घरात असुरक्षित असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.

'त्या' पोलिसावरही कारवाई व्हावी...

Loading...

सासऱ्याच्या विरोधात तक्रार का केली, हे प्रकरण घरच्या घरी मिटवायला हवे होते, असे सांगणाऱ्या 'त्या' पोलिसावर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.

VIDEO : सरकार मेगाभरती कधी करणार? आदित्य ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...