Home /News /mumbai /

VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळली दरड; वाहतूक पर्यायी मार्गे वळवली

VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळली दरड; वाहतूक पर्यायी मार्गे वळवली

मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे ही दरड महामार्गावर कोसळली. यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने मगामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आणि ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

    Mumbai-Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात (Parashuram Ghat) दरड कोसळली आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास दरड महामार्गावर आली. यानंतर परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने या कामाला वेळ लागत आहे. यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक चिरणी - आंबडस या पर्यायी मार्गे वळवली आहे. Weather Update : पुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा! मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे ही दरड महामार्गावर कोसळली. यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने मगामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आणि ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. महामार्गावरील दरडीचा व्हिडिओही समोर आला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत दरम्यान, परशुराम घाट महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम करण्यासाठी 25 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. वाहतूक बंदी कालावधीत फक्त कमी वजनाची वाहतूक आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी तसंच पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. पाणीकपातीनंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, आता मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने आता पुन्हा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली गेली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Road accident

    पुढील बातम्या