Home /News /mumbai /

मुंबईत धोका कायम! 24 तासात कोरोनाचे 522 नवे रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत मोठी वाढ

मुंबईत धोका कायम! 24 तासात कोरोनाचे 522 नवे रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत मोठी वाढ

या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

आतापर्यंत मुंबईत 813 प्रतिबंधित क्षेत्र होते, कोरोनाची वाढती संख्या पाहता त्यामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे

  मुंबई, 23 एप्रिल : देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) रुग्णसंख्येने 21000 टप्पा पार केला असून मुंबईतील (Mumbai) धोका कायम आहे. आज मुंबईत कोरोनाचे (Covid -19) 522 रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार गेली आहे. याशिवाय मुंबईतील धोका लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत 813 प्रतिबंधित क्षेत्र होते त्यामध्ये वाढ करीत आता मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 930 पर्यंत पोहोचली आहे. भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर यापैकी 189 भागातील प्रतिबंध हटवण्यात आला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 522 रूग्णसंख्या वाढली आहे. काल मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 3683 इतकी होती आज ती 4205 इतकी  झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, मालेगाव या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. त्यातच आज मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊन असतानाही अनेकदा विविध कारणांनी लोक रस्त्यांवर गर्दी करतात. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा लोकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मुंबई आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आज 25 नवे रुग्ण आढळून आले आहे. येथे संसर्गावर नियंत्रण आणणे अवघड आहे. मात्र यासाठी तेथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. संबंधित - कोरोना योद्ध्यांवरील संकट कायम, 24 तासांपूर्वी पॉझिटिव्ह आलेली नर्स उपचाराविना मोठी बातमी! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कोरोना लसीच्या मानवी चाचणीस सुरुवात लॉकडाऊनमुळे बायको अडकली माहेरी, नवऱ्याने रागात प्रेयसीशी लग्न करुन थाटला संसार संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Corona virus in india

  पुढील बातम्या