मुंबईत रात्री उशिरापर्यंत सुरू होता डान्सबार, 11 बारगर्ल्ससह 20 जण ताब्यात, कारवाईचा LIVE VIDEO

मुंबईत रात्री उशिरापर्यंत सुरू होता डान्सबार, 11 बारगर्ल्ससह 20 जण ताब्यात, कारवाईचा LIVE VIDEO

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगाव परिसरातील स्टार बार अँड रेस्टॉरंटवर छापा मारला. रात्री 1 वाजेपर्यंत हा डान्स बार सुरूच होता.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास राज्य सरकारने नियमांसह परवानगी दिली. परंतु, मुंबईतील गोरेगाव परिसरात एका डान्स बारवर छापा मारण्यात आला असून 11 बारगर्लसह 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत हा डान्स बार सुरू होता.

लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसंच हॉटेलचालकांना परवानगी देत बार सुरू करण्यासही राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. त्यामुळे राज्यभरातील बार सुरू झाले आहे. मात्र, राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमाची पायामल्ली केली जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगाव परिसरातील स्टार बार अँड रेस्टॉरंटवर छापा मारला. रात्री 1 वाजेपर्यंत हा डान्स बार सुरूच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्टार बार आणि रेस्टॉरंटवर छापा  टाकला असता 11 बारगर्ल्स डान्स फ्लोरवर डान्स करत असल्याचा आढळून आल्या. पोलिसांनी 11 बारगर्ल्सला ताब्यात घेतले. यावेळी 15 ग्राहकांसह 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत डान्स बारमध्ये काम करणारे वेटर, सुपरवायझर, कॅशियर आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

डीसीपी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू होता. लॉकडाउनच्या काळात मुंबई पोलिसांनी केलेली ही पहिला कारवाई आहे.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 8:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या