'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य!

'हम गम में खुशी ढूंढते है, तो दुनिया हमारी खुशी में गम भुलाती है', बारबालांचं असं असतं आयुष्य!

'सभ्य समाजाने कितीही नाकं नुरडली तरी समाजातल्या या गोष्टी कधीच थांबणाऱ्या नाहीत.'

  • Share this:

अक्षय कुडकिलवार, मुंबई 17 जानेवारी : देशभरातून लोक मुंबईत पोट भरण्यासाठी आणि दु:ख विसरण्यासाठीही येतात. त्यामुळेच मुंबईला नाव पडलं 'मायानगरी'. या मायानगरीचं आयुष्य दुहेरी आहे. दिवसाचं आणि रात्रीचं. रात्रीच्या मुंबईचा बाजही काही वेगळाच असतो. फुटपाथवर राहणाऱ्या माणसांपासून ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहणाऱ्या माणसांपर्यंत इथं सगळ्यांना जीवाची मुंबई करता येते. मुंबईच्या याच रात्रीच्या दुनियेतलं एक ठिकाण म्हणजे 'डान्स बार'. काहींसाठी पोटापाण्याची दुनिया तर काहींसाठी बदनाम ठिकाण. या 'डान्स बार'मध्ये काम करणाऱ्या हजारो मुलींना जसं ग्लॅमर दिलं तसचं दुखरं आयुष्यही.

कोर्टाच्या आदेशाने हे 'डान्स बार' आता पुन्हा सुरू होणार असल्याने या बारमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या आयुष्यात पुन्हा एक नवी सुरूवात होणार आहे. असं आयुष्य जगायला त्यांनाही आवडत नाही. पण परिस्थिती आम्हाला ते करायला भाग पाडते. इभ्रतीपेक्षा पोटाची आग महत्त्वाची आहे, ही इथं काम करणाऱ्या मुलींनी व्यक्त केलेली व्यथा आहे.

2004 मध्ये डान्सबार बंद करणाच्या निर्णयानं या बारमध्ये काम करणाऱ्या मुलींचं आयुष्यच बदलून गेलं. मुंबईत अंदाजे 1300 बार आहेत आणि त्या बारमध्ये काम करणाऱ्या 25 हजार मुली आहेत. सरकारच्या या निर्णयानं त्यांची रोजीरोटीच बंद झालं. नंतर काहींनी दुसरा व्यवसाय निवडला. काही मालकांनी या मुलींना विदेशात नेलं तर काही मुली बंद दाराआड अवैधपणे नाचू लागल्या. आता 14 वर्षांनंतर त्यांचं हे रात्रीचं आयुष्य पुन्हा सुरू होणार आहे.

रात्री उशीरापर्यंत जागणं, कितीही दु:ख असलं तरी चेहेऱ्यावर काम हसू ठेवणं, पुरुषांच्या वखवखलेल्या नजरेला नजर भिडवून नाचणं हा त्यांच्या आयुष्याचाच भाग बनलंय. राजस्थान, आग्रा, नॉर्थइस्ट मधली राज्य आणि नेपाळमधूनही मुली यासाठी मुंबईत येतात. यातल्या बहुतांश मुली या गरीब कुटुंबातल्या. नाचून पैसै कमावणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं हा त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं आहे.

यात त्यांचं शोषणही होतं, अत्याचाराला बळी पडावं लागतं, सर्वस्व देऊन मोठं मोल चुकवत आयुष्याच्या रहाटगाडग्यात चालावं लागतं. या क्षेत्रात आल्यावर पुन्हा परतीचे मार्ग बंद होतात ही एका तरुणीची प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाणारी आहे.

सभ्य समाजाने कितीही नाकं नुरडली तरी समाजातल्या या गोष्टी कधीच थांबत नाहीत. दारुबंदीच्या फोलपणाने हे पुन्हा एकदा उघड झालंय. बंदी घालून उलट जास्त वाईट गोष्टी वाट्याला येतात असं मतही या मुलींनी व्यक्त केलेय.

आम्ही दु:ख विसरण्यासाठी नाचतो आणि आनंद शोधतो आणि त्या आनंदात जग आपलं दु:ख विसरणाऱ्या प्रयत्न करतं. मुंबईतल्या एका बारमध्ये काम करणाऱ्या बार गर्लची प्रतिक्रिया त्यांचं सर्व आयुष्य सांगून जाणारी आहे.

VIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग? ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय

First published: January 17, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading