S M L

VIDEO - दहीहंडी विशेष : मुंबईत यंदा गोपिकांचा उत्साह मोठा

दादरची हंडी फोडणाऱ्या महिला पथकाशी आमच्या प्रतिनिधी रेणुका धायबर यांनी संवाद साधला.

Updated On: Sep 3, 2018 12:06 PM IST

VIDEO - दहीहंडी विशेष : मुंबईत यंदा गोपिकांचा उत्साह मोठा

मुंबई, 3 सप्टेंबर : मुंबईत सगळीकडे आज सकाळपासून दहीहंडीची धामधूम सुरू आहे. दादर, परळ, ठाणे परिसरात महिला गोविंदा पथकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसतोय.

दादर स्टेशन परिसरातली दहीहंडी चार थर लावून फोडत महिला पथकांनी सलामी दिली आणि एकच जल्लोष झाला. दादरप्रमाणेच ठाण्यात हिरानंदानी मेडोजची दहीहंडी फोडायला महिला पथक आघाडीवर आहे.

दादरची हंडी फोडणाऱ्या महिला पथकाशी आमच्या प्रतिनिधी रेणुका धायबर यांनी संवाद साधला.



दादरमध्ये पाच थर लावून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जन्माष्टमीच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रभरात दहीहंडीचा उत्साह अवर्णनीय असतो. सळसळता उत्साह, धाडस, संस्कृती आणि खेळ या या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजे हा खेळ आहे. ठाणे आणि मुंबईतले सर्व रस्ते आज गोविंदा पथकांच्या उत्साहाने ओसंडून वाहत आहेत.

Loading...
Loading...

मुंबई आणि ठाण्यात अनेक गोविंदा पथकं असून दहीहंडीच्या दोन महिन्यांआधीपासून त्यांचा सराव सुरू असतो. उंच थर लावून हंडी फोडून तो विक्रम आपल्या नावावर करण्याचा सर्व गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. यात तरुणीही मागे नसून खास महिलांची गोविंदा पथकं प्रसिद्ध झाली आहेत.

मुंबई, ठाण्यातल्या या उत्सवाला सध्या कॉर्पोरेटचं रूप आलं असून राजाश्रय मिळत असल्यानं त्याची उलाढाल काहीशे कोटींवर गेली आहे. जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिष्ठांव्दारे दहीहंडीचं आयोजन केलं असून लाखोंची बक्षिसं ठेवून तरूणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संगीत, गाणी, वाद्य, यांचा मेळ घातला गेल्याने लोकांचं मनोरंजनही भरपूर होत असतं.

अनेक मंडळं बॉलिवूडच्या कलाकारांना या उत्सवासाठी आमंत्रित करीत असल्यानं दहीहंडी उत्सवाला ग्लॅमरही मिळालं आहे. मात्र उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा कल वाढत असल्यानं त्या विरूद्ध काही जण कोर्टात गेले आणि बक्षिसाचं अमिष दाखवून उंच थर लावण्याच्या प्रयत्नांना सुप्रीम कोर्टानं जोरदार चाप लावलाय. उंच थरांवर बंधणं आलीत. या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याची मागणीही दरवर्षी होत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close