ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचे 'दाऊद गँग'शी संबंध ?

महाराष्ट्रातल्या दोन राजकीय पक्षांचा 'डी' गँगशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती इक्बाल कासकरच्या चौकशी दरम्यान, समोर आलीय. पोलिसांच्या खास सूत्रांनी नेटवर्क 18ला यासंबंधीची माहिती दिलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2017 04:51 PM IST

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचे 'दाऊद गँग'शी संबंध ?

मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या दोन राजकीय पक्षांचा 'डी' गँगशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती इक्बाल कासकरच्या चौकशी दरम्यान, समोर आलीय. पोलिसांच्या खास सूत्रांनी नेटवर्क 18ला यासंबंधीची माहिती दिलीय. तसंच बिल्डर खंडणी वसूली प्रकरणी ठाण्यातले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पोलिसांच्या रडावर असल्याचं बोललं जातंय. या दोन नगरसेकांच्या मदतीनेच इक्बाल खंडणी वसूली करत होता. अशीही माहिती मिळतेय.

ठाण्यात इक्बाल कासकर हा त्याचा भाऊ दाऊद इब्राहीमच्या नावाने खंडणी वसूली करत असल्याचा आरोप आहे. कालच त्याला ठाणे पोलिसांच्या खंडणी वसूली पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केलीय. आज त्याला न्यायालयात हजर केला असता कोर्टाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. इक्बाल कासकरला मायग्रेन आणि ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने त्याला एवढी पोलीस रिमांड देऊ नये, अशी मागणी त्याच्या वकीलाने न्यायालयात केली पण कोर्टाने ती फेटाळून लावली.

दरम्यान, दाऊद गँगशी संबंध असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावलेत. पोलिसांनी यासंबंधीचे पुरावे असतील ते समोर आणावेत, विनाकारण निराधार आरोप करू नयेत. अशा बिनबुडाच्या आरोपांना आम्ही फारसं महत्व देत नाही, असंही सुनील तटकरे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलंय.

काय आहे इक्बाल कासकरचं खंडणी वसूली प्रकरण ?

Loading...

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला काल ठाण्यातील हसीना पारकरच्या घरातूनच अटक करण्यात आलीय. एका बिल्डरला खंडणी वसूलीसाठी धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ठाण्यातील एका बिल्डरकडून इक्बाल कासकरने खंडणीच्या रुपाने 4 फ्लॅट बळकावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याकामी त्याला हसीना पारकरच्या दिरानेही मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. ठाण्यात काही नगरसेवकांच्या मदतीने इक्बाल कासकर दाऊदच्या नावाने फोन करून खंडणी वसूल करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

(सीएनएन न्यूज 18 नेटवर्क)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...