BRAKING: मुंबईतील लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

BRAKING: मुंबईतील लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

लालबाग इथे गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 06 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) लालबाग (lalbaugcha) परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून जखमींना तातडीने केईएम रुग्णालयात (kem hospital) दाखल करण्यात आले आहे.

लालबाग इथे  गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.

5G ट्रायलच्या प्रतिक्षेत टेलिकॉम कंपन्या; दूरसंचार विभागाकडे केल्या या मागण्या

आगीचा अचानक भडका उडाल्यामुळे 16 जण जखमी झाले आहे.  यात 3 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.  तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'काँग्रेसशी हातमिळवून जनतेचा विश्वास गमवला', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी हजर आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. पण नेमकी गॅस गळती का झाली, हे अद्याप मात्र कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईम रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.

Published by: sachin Salve
First published: December 6, 2020, 9:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या