मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Cyclone Tauktae : वादळाने वाट निवडली!, मुंबईकरांनो, घराबाहेर पडू नका, पालिकेचं आवाहन

Cyclone Tauktae : वादळाने वाट निवडली!, मुंबईकरांनो, घराबाहेर पडू नका, पालिकेचं आवाहन

या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज

या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज

या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 मे : लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. सध्या तौत्के वादळ (Cyclone Tauktae) केरळच्या दिशेनं सरकलं जरी असलं तरी मुंबईवर धोका कायम आहे. मुंबईत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शहरातील अनेक भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. तौत्के वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा Vaccine दान करा; WHO नं का दिला असा सल्ला?

या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफ (NDRF)च्या टीम्स सुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत.

तौत्के चक्रीवादाळात आपत्कालीनल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या 10 टीम्स तैनात करण्यात येत आहेत. या 10 टीम्सपैकी 2 टीम्स गोव्यात, 2 टीम्स सिंधुदुर्गात, 2 टीम्स रत्नागिरीत, 4 टीम्स गुजरातमध्ये उद्यापासून सज्ज राहणार आहेत.

15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे?

तौत्के वादळ 15 तारखेच्या पहाटे अधिक तीव्र होऊन त्यानंतरच्या 24 तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याती शक्यता आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. 15 ते 17 मे दरम्यान कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

First published: