मुंबई, 25 मे : तौक्ते चक्रीवादळामुळं (Cyclone Tauktae) 17 मे रोजी मुंबईमध्ये वरप्रदा या टगबोटचा (Tugboat Varaprada) अपघात झाला होता. समुद्र किनाऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर या वरप्रदा टगबोटच्या अवशेषांचा ढिगाला आढळला आहे. ही टगबोट बुडाली तेव्हा त्यात 13 लोक स्वार होते. त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आलं असून 11 जणांचे मृतदेह आढळले आहेत. आता या टगबोटचा बुडण्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
(वाचा-cyclone tauktae मुळे नुकसानग्रस्तांना भरपाई जाहीर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. त्या व्यक्तीचं नाव सूरज चव्हाण आहे. 22 वर्षाचा सूरज हा डेक कैडेट होता. त्याच्या शोधासाठी आणि ओळख पटवण्यासाठी सूरजचे वडील संतलाल चव्हाण मुंबईत आले आहेत. सोमवारी DNA टेस्टसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. सूरजच्या वडिलांनी सांगितलं की, सूरज समुद्रात ऑईल टँकरवर होता. पण तो वरप्रदावर कसा पोहोचला याबाबत काही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार सूरजने अपघाताचा व्हिडिओ तयार करून मित्रांना पाठवला होता. त्यानंतर सूरजचा मोबाईल बंद येत आहे. व्हिडिओनंतर काही वेळातच टगबोट समुद्रामध्ये पूर्णपणे बुडाली असावी असं म्हटलं जात आहे. सूरजचे वडील संतलाल चव्हाण यांनी सांगितलं की, माझ्या डीएनएचे सँपल घेण्यात आले आहेत. 24 तासांत रिपोर्ट आल्यानंतर माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
(वाचा-mucormycosis शी लढा देण्यासाठी अजित पवारांची मोठी घोषणा, दिले नवे निर्देश)
यापूर्वी टगबोट अपघातातून वाचलेल्या इंजिनीअर फ्रान्सिस के सिमोन यांनी ही बोट अत्यंत वाईट अवस्थेत आणि समुद्रात नेण्याच्या लायकीची नव्हती अशी माहिती दिली. तरीही चक्रीवादळादरम्यान तिला समुद्रात उतरवण्यात आलं. फ्रान्सिस सिमोन या अपघातात बचावलेल्या दोघांपैकी एक आहे. शिपची दुर्दशा झालेली असतानाही कॅप्टन आणि कंपनीनं तौक्ते चक्रीवादळाकडे दुर्लक्ष करत जोखीम घेतली. त्याचा परिणाम सर्वांनी पाहिला. शिपमध्ये असलेल्या लोकांपैकी 11 जणांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.