Home /News /mumbai /

Cyclone Tauktae डोंबिवली : ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने लागली आग, वाहतुकीवर परिणाम, पाहा Video

Cyclone Tauktae डोंबिवली : ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने लागली आग, वाहतुकीवर परिणाम, पाहा Video

Tree collapse on Overhead wire रेल्वेच्या सहाव्या लेनवर असलेल्या ओव्हरहेड वायरवर एक झाड कोसळल्याने दुर्घटना घडली. झाड ओव्हर हेड वायरवर पडल्यानं हायवोल्टेजमुळं झाडानं पेट घेतला होता. एका प्रवाशानं या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मे : मुंबई उपनगरांच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae ) चांगलाच तडाखा बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी जोरदार पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचलं आहे, कुठं झाडं उन्मळून (Trees Fallen) पडली आहे. त्यामुळ मुंबईचं (Mumbai) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. या वादळी वाऱ्यामुळं डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्टेशनजवळ एक झाड ओव्हरहेड वायरवर (Tree collapse on Overhead wire) कोसळलं. त्यामुळं झाडाला आग लागली. या प्रकारानंतर रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. (वाचा-भयंकर चक्रीवादळातही प्रामाणिकपणे करीत होती स्वत:चं काम, आनंद महिंद्राकडून कौतुक) तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम कल्याण डोंबिवलीतही जाणवत आहे. दुपारी शहरात जोरदार वादळी वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी पूर्ण झाडंच उन्मळून पडल्याचंही पाहायला मिळालं. डोंबिवली रेल्वे स्टेशन नजीकही वाऱ्यामुळं एक दुर्घटना घडली आहे. याठिकाणी रेल्वेच्या सहाव्या लेनवर असलेल्या ओव्हरहेड वायरवर एक झाड कोसळल्याने दुर्घटना घडली. झाड ओव्हर हेड वायरवर पडल्यानं हायवोल्टेजमुळं झाडानं पेट घेतला होता. एका प्रवाशानं या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या रेल्वे ट्रॅकवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळं या अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान ओव्हरहेड वायरवर पडलेलं झाड हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काम सुरू केलं आहे. तसंच ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचं कामही हाती घेण्यात आलं. (वाचा-Cyclone Tauktae: रस्त्यांवर पाणी, विमानतळ बंद, सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबई बेहाल) पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्याचं रूपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात झालं असून रात्री 8 नंतर ते गुजरात किनारपट्टीच्या जवळ पोहोचेल. रात्री 11 च्या सुमारास किनारपट्टीला धडकण्याचा (Landfall)अंदाज वर्तवण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Dombivali, Fire, Mumbai local, Railway, Tree

    पुढील बातम्या