Home /News /mumbai /

Cyclone Tauktae: ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळली, पाहा VIDEO

Cyclone Tauktae: ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळली, पाहा VIDEO

Cyclone Tauktae in Thane, Mumbai: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळाचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

ठाणे, 17 मे: तौत्के चक्रीवादळा (Cyclone Tauktae) मुळे वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरात अनेक झाडांची पडझड (Tree fell down) झाली आहे. ठाण्यात विविध ठिकाणी 13 झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता ठाण्यातील शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) कमान कोसळली आहे. कळव्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान सोसाट्याच्या वाऱ्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. कमान कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी दाखल झाले. या कमानीचा मलबा घटनास्थळावरुन हटवण्यात येत आहे. चक्रीवादळाचे बळी; राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे! ठाण्यात 13 झाडांची पडझड मुंबईसोबतच ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर या भागांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. तर मुंबईतील सखल भागांतही पाणी साचले आहे. ठाण्यात रात्रीपासून जोरदार पासून सुरू आहे. तसेच जोरदार वारे ही वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात 13 मोठी झाडे उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. उल्हासनगरमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cyclone, Maharashtra, Mumbai, Thane

पुढील बातम्या