मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Cyclone Tauktae चा तडाखा, मुंबईच्या समुद्रात जहाज बुडालं, 140 जणांना वाचवलं ; 170 बेपत्ता

Cyclone Tauktae चा तडाखा, मुंबईच्या समुद्रात जहाज बुडालं, 140 जणांना वाचवलं ; 170 बेपत्ता

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला गेल्या दोन दिवसात खोल समुद्रात अडकेलेल्या जहाजांवरून चार SOS चे कॅाल आलेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं मोठं रेस्क्यू ॲापरेशन सध्या अरबी समुद्रात सुरू आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 18 मे: तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) मुंबईला (Mumbai) झोडपून काढले. मुंबईच्या समुद्री भागात 175 किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडालं. भारतीय नौदलाने खवळलेल्या समुद्रातून 146 लोकांना सुखरूप वाचवलं. पण अजूनही 170 पेक्षा जास्त लोकं अजून बेपत्ता आहे.

खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक जहाज अडकले आहे. या जहाजावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी

INS कोलकाताला पाठवले आहे. या जहाजावर 137 लोकं अडकलेली आहे. त्यापैकी 38 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.

'तोत्के' चक्रिवादळ शमलं असलं तरी खोल समुद्रात मात्र अजूनही वातावरण प्रचंड प्रतिकूल आहे. समुद्राला जीवघेणं उधाण आलंय. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला गेल्या दोन दिवसात खोल समुद्रात अडकेलेल्या जहाजांवरून चार SOS चे कॅाल आलेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं मोठं रेस्क्यू ॲापरेशन सध्या अरबी समुद्रात सुरू आहे. भारतीय नौदलाने मुंबईच्या नौदल एअर बेस INS शिक्रा येथून सी किंग हेलीकॅाप्टर बचाव कार्यासाठी पाठवलंय.

बार्ज P305 या प्रवासी जहाजावर २७३ प्रवासी आणि खलासी अडकलेत. त्यापैकी १४६ प्रवाश्यांना भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौकांनी वाचवून सुरक्षितपणे बाहेर काढलंय.

त्यानंतर गल कस्ट्रक्ट्रर या जहाजावर १३७ प्रवासी होते. या जहाजावरील प्रवाश्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने टोईंग बोट वाटर लिली आणि CGS सम्राट घटनास्थळी पाठवली आहे. त्यांचं तिथे बचाव कार्य सुरू आहे.

ॲायल रिंग सागर भूषण प्रकल्पावर १०१ कर्मचारी अडकलेत. या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाने INS तलवार युद्धनौकेला कालच पाठवलं होतं. पण उधाणलेल्या समुद्रामुळे त्यांना बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे. त्यांचं बचाव कार्य अद्याप सुरूच आहे.

बार्ज SS-3 या प्रवासी जहाजावर १९६ प्रवासी अडकले. त्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल हेलीकॅाप्टर पाठवत असल्याची माहिती मिळतेय.

First published:

Tags: Cyclone, Maharashtra, Mumbai