Home /News /mumbai /

Cyclone Tauktae : मुंबईजवळ पोहोचले चक्रीवादळ, पाहा हा LIVE VIDEO

Cyclone Tauktae : मुंबईजवळ पोहोचले चक्रीवादळ, पाहा हा LIVE VIDEO

तोक्ते वादळ मुंबईच्या समुद्रीकिनाऱ्यालगत पोहोचले असता प्रभाव कमी झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे.

    मुंबई, 17 मे : अखेर तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) मुंबईच्या (Mumbai) समुद्रीकिनारी भागात पोहोचले आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे वादळ गुजरातच्या (Gujrat) दिशेनं निघाले आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरणावर मोठा बदल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. वादळीवाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तोक्ते चक्रीवादळाने अरबी समुद्रात दहशत निर्माण केली आहे. केरळ, गोव्याच्या समुद्रीकिनाऱ्यालगत असलेल्या भागात चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. आता हे वादळ मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तोक्ते वादळ मुंबईच्या समुद्रीकिनाऱ्यालगत पोहोचले असता प्रभाव कमी झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 3 वाजेपासून अनेक भागात थांबून थांबून पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळ जेव्हा मुंबई जवळील समुद्रकिनाऱ्यापासून जाईल तेव्हा मुंबई हवेचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे 60 ते 70 किमी/प्रति तासाने वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या