मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Cyclone Tauktae : मुंबईसह, किनारपट्टी भागात वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, 3 दिवस अलर्ट

Cyclone Tauktae : मुंबईसह, किनारपट्टी भागात वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, 3 दिवस अलर्ट

Cyclone Tauktae rains forecast गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मे : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तॉक्ते चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठा तडाखा बसेल असा अंदाज नसला तरी मुंबई मनपाने मात्र काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

('सरकारच्या मनात पाप! मराठ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी वाढवला Lockdown')

कोरोना महामारीच्या संकटामध्ये (Coronavirus Pandemic)आता किनारपट्टीच्या भागांमध्ये तॉक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae)धोकाही निर्माण झाला आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पण तसं असलं तरी गुजरातला याचा मोठा फटका बसू शकतो.

महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे पालघर भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही मुंबईतील कोविड सेन्टरच्या जवळपास असणाऱ्या अनेक झाडांची छाटणी पालिकेने सुरू केली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन टँकवर झाडं पडू नयेत याची काळजी घेतली जात आहे. 14 ते 16 मे दरम्यान मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

(वाचा-'सरकारच्या मनात पाप! मराठ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी वाढवला Lockdown')

'तॉक्ते' आहे नाव

हे चक्रीवादळ 2021 वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. याचे नाव तॉक्ते (Tauktae) ठेवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचं नाव म्यानमारने ठरवले आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो.

गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Cyclone, Mumbai News