Home /News /mumbai /

Cyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Cyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Cyclone Tauktae in Mumbai: तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर येथे झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.

    मुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) जरी मुंबईच्या (Mumbai) किनाऱ्यावर थेट धडकले नसले तरी त्याचा परिणाम हा मुंबई आणि आसपासच्या परिसरात दिसून येत आहे. मुंबईसोबतच ठाणे (Thane), डोंबिवली (Dombivli), उल्हासनगर (Ulhasnagar) या भागांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. तर मुंबईतील सखल भागांतही पाणी साचले आहे. वादळाचा तडाखा हा मुंबई हवामान विभागालाही (Regional Meteorological Center, Mumbai) बसला आहे. हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशीक केंद्राला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचं पहायला मिळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई हवामान विभागाच्या परिसरातील झाडे उन्मळून पडली आहेत. हवामान विभागाचे संचालक के. एस. होसळीकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशीक केंद्राच्या परिसरातील असून त्यात दिसत आहे की, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. Alert: मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा; पुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार उल्हासनगरमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणाहून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलंमोठं झाड उन्मळून या रिक्षावर पडले. त्यामुळे रिक्षातील लखुमल कामदार या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक सुनील मोरे आणि अन्य एक प्रवासी त्यामध्ये गंभीर जखमी आहेत. टेम्पोवर होर्डिंग पडल्याने अपघात ठाण्यातील देसाई नाका कल्याण शीळ फाटा या ठिकाणी होर्डिंग लहान टेम्पोवर पडल्यामुळे दोन जणांना दुखापत झाली आहे. तर टेम्पोचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाहतूक विभाग आणि आपत्ती व्यापास्थापन यांनी होर्डिंग बाजूला केली आहे. ठाण्यात रात्रीपासून जोरदार पासून सुरू आहे. तसेच जोरदार वारे ही वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात 13 मोठी झाडे उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा रायगडमध्ये दुसरा बळी, भिंत कोसळून जखमी महिलेचा मृत्यू मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरांत भरले पाणी  सकाळपासून मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. मुंबईतील क्राफड मार्केट परीसरात पाणी साचले असून मुंबई पोलीस आयुक्तालया मागील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याची 1 लेन बंद झाली. या रस्त्याने जाणाऱ्या गाड्या पाण्यातून मार्ग काढत जात आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai, Thane

    पुढील बातम्या