Home /News /mumbai /

Cyclone Tauktae : मुंबईला तर चक्रीवादळाने झोडपलं, ठाणे-डोंबिवलीत काय आहे परिस्थिती?

Cyclone Tauktae : मुंबईला तर चक्रीवादळाने झोडपलं, ठाणे-डोंबिवलीत काय आहे परिस्थिती?

ठाण्यात रात्रीपासून जोरदार पासून सुरू आहे. तसेच जोरदार वारे ही वाहत आहेत.

    ठाणे, 17 मे : तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबईसह किनारपट्टीच्या भागात पाहायला मिळत आहे. मात्र केवळ मुंबईच नाही तर ठाणे-डोंबिवलीतही चक्रीवादळाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणाहून अपघाताच्या बातम्या समोर आल्या आहेत. ठाण्यात भलं मोठं झाड उन्मळून पडलं असून तळवपाली येथे हे पडलं आहे. मोकाशी नर्सिंग येथे ही घटना घडली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली असून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय झाडांची छाटणी सुरू झाली आहे. ठाण्यात 2 कम्पाउंड वाॅल पडल्या आहे. - 59 झाडे पडली - 21 झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्या - 3 मोठी झाडे धोकादायक अवस्थेत - 3 ठिकाणी पाणी साचले डोंबिवली - डोंबिवली पुर्व भागात दुर्घटना घडली असून गांधीनगर भागात मोठे झाड कोसळले आहे. नेमके बंगल्यावर हे झाड कोसळले असून पहिल्या मजल्याचे मोठे नुकसान झाले आहे. बंगल्यावरील पत्र्याचे छत तुटले. बंगल्याच्या खिडक्याही तुटल्या आहेत. देसाई नाका येथे दुपारी मोठे लोखंडी होर्डिंग पडले होते. टेम्पोवर या घटनेतील जखमी व्यक्तींची नावे 1) सचिन शांताराम चव्हाण, वय 35 रा. विठावा ठाणे. 2) छबन चिमण चौधरी, वय 45 रा विठावा ठाणे. हे ही वाचा-चक्रीवादळाचे बळी, राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे! ठाण्यात 13 झाडांची पडझड मुंबईसोबतच ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर या भागांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. तर मुंबईतील सखल भागांतही पाणी साचले आहे. ठाण्यात रात्रीपासून जोरदार पासून सुरू आहे. तसेच जोरदार वारे ही वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात 13 मोठी झाडे उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. उल्हासनगरमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. उल्हासनगर कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cyclone, Dombivali, Thane

    पुढील बातम्या