मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

VIDEO: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

सोमवारी तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रुप मुंबईकरांनी अनुभवलं.  मुंबई शहरात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात अशीच एक दुर्दैवी घटना घडली.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 21 मे: सोमवारी तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रुप मुंबईकरांनी अनुभवलं. दिवसभर शहरात सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानंही मुंबईला चांगलंचं झोडपून काढलं. यावेळी मुंबई शहरात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र मालाडमध्ये झाडं कोसळल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीत एक महिला थोडक्यात बचावली. तिच्या अंगावर झाडं कोसळणार मात्र तिचं नशीब बलवत्तर महिला वाचली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. पण मालाडमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरुन जाणाऱ्या राजकुमार जैयस्वाल या तरुणाच्या डोक्यात एका झाडाची फांदी उन्मळून पडली. या दुर्घटनेत राजकुमार जैयस्वाल गंभीर जखमी झाला. झाडाची फांदी पडताच त्याच्या हेल्मेटचेही दोन तुकडे झाले आणि त्यात जैयस्वालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.

तब्बल 13 तास चालली शस्त्रक्रिया

या घटनेत जखमी झालेल्या जैयस्वालला तातडीनं सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्याच्यावर तब्बल 13 तास शस्त्रक्रिया चालली. मात्र राजकुमार याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बुधवारी जैयस्वाल याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा- 31 मेपर्यंत गोवा बंद! Coronavirus नियंत्रणासाठी कर्फ्यूत वाढ

जैयस्वाल याचा किराणा मालाचा व्यवसाय होता. त्याचे आई-वडिल हे अंध असून पत्नी आणि मुलं हे उत्तरप्रदेश राज्यात वास्तव्यास असतात. कुटुंबाची सर्व जबाबदारी ही राजकुमार याच्यावर होती. मात्र आता घरातल्या कर्ता-धर्ता गेल्यानं जैयस्वाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर राजकुमार जैयस्वाल हा गरीब कुटुंबातील असल्यानं त्याच्या कुटुंबियांना सरकारनं आणि पालिकेनं आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

First published:

Tags: Cctv footage, Cyclone, Mumbai