Home /News /mumbai /

Cyclone Tauktae मुळे मुंबईच्या समुद्रात 37 जणांचा मृत्यू, अजूनही 38 बेपत्ता

Cyclone Tauktae मुळे मुंबईच्या समुद्रात 37 जणांचा मृत्यू, अजूनही 38 बेपत्ता

P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते त्यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केलं आहे.

    मुंबई, 20 मे : तीन दिवसांपूर्वी तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात चार बार्ज भरकटले. नौदलाने जीवाची बाजी लावून खवळलेल्या समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन करून कर्मचाऱ्यांना वाचवले. या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान 37 मृतदेह सापडले आहे. तर अजूनही 38 जण बेपत्ता आहे. मुंबईच्या खोल समुद्रात चार बार्जवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बार्जचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले होते. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने (Indian Navy) युद्धपातळीवर आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आतापर्यंत 611 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून या सर्व कर्मचारी, खलाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करण्यात आले. भारतीय नौदलाकडून INS कोच्ची, INS कोलकाता, INS तलवार, INS बेतवा आणि INS बीयास या युद्धनौकांच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यासोबतच नौदलाचे तीन हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले होते. फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढला आहे का? थेट मुख्य सचिवांकडेच विचारणा P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते त्यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केलं आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन कर्मचाऱ्यांना वाचवलं आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. चारही बार्जवरुन नौदलाच्या टीमने आतापर्यंत 611 जणांना रेस्क्यू केलं आहे. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अद्यापही 38 कर्मचारी हे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. खवळलेल्या समुद्रात बार्ज भरकटल्यानंतर घाबरलेल्या काही कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या घेतल्या आणि त्यानंतर खवळलेल्या समुद्रात त्यापैकी काहींनी आपले प्राण गमावले.  ONGCने याकडे दुर्लक्ष का केले? नवाब मलिकांचा सवाल दरम्यान, चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता शासकीय यंत्रणेणे खबरदारी म्हणून सुरक्षेच्या संदर्भात पूर्वतयारी केली होती. मात्र, या चक्रीवादळात खवळलेल्या समुद्रात चार बार्ज मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर भरकटले. या बार्जवर 700 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. यापैकी 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याच प्रश्नावरुन नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ओएनजीसी (ONGC)वर गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केले आहेत. बालकलाकार कसा झाला दक्षिणेचा सुपरस्टार? पाहा Junior NTR चा थक्क करणारा प्रवास नवाब मलिक यांनी ट्विट्स करत म्हटलं, तौत्के चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबंधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे दुर्लक्ष का केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का नाही केले? असा सवाल करतानाच कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या