Home /News /mumbai /

Cyclone Tauktae: वादळाचा मुंबईला तडाखा; हाजी अली जवळ 11 लहान बोटी बुडाल्याची भीती

Cyclone Tauktae: वादळाचा मुंबईला तडाखा; हाजी अली जवळ 11 लहान बोटी बुडाल्याची भीती

मुंबईला चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईत 479 ठिकाणी झाड किंवा झाडाच्या फांद्या तुटण्याची नोंद झाली आहे.

मुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला मोठा फटका (Cyclone Tauktae affect Mumbai) बसल्याचं पहायला मिळत आहे. चक्रीवादळ थेट मुंबईला धडकलं नसलं तरी त्याचा परिणाम हा मुंबईवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. त्यातच आता हाजी आली परिसरात 11 लहान बोट बुडाल्याची माहिती (fear of 11 small boats sinking near haji ali) समोर येत आहे. 11 लहान बोटी बुडाल्याची भीती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळाच्या दरम्यान मुंबईतील हाजी अली परिसरातील समुद्रात 11 लहान बोटी बुडाल्याची माहिती समोर येत आहे. या बोटींवर कुणी खलाशी होते की नाही या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. वाचा: Cyclone Tauktae : मुंबईला तर चक्रीवादळाने झोडपलं, ठाणे-डोंबिवलीत काय आहे परिस्थिती? मढ जेट्टी येथे बोट बुडाल्याने एक जण बुडाल्याची भीती तर मढ जेट्टी येथे बोट बुडाल्याने त्यावर असलेले पाच जण समुद्रात पडले. या पाच जणांपैकी चार व्यक्ती सुखरूप आहेत तर एक जण समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. मुंबईत झाडांची पडझड मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 156 मुंबई पूर्व उपनगरात 78 तर पश्चिम उपनगरात तब्बल 245 अशा एकूण 479 ठिकाणी झाडाच्या फांद्या किंवा झाडे पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबई शहरात 15 ठिकाणी घरांची पडझड तर पूर्व उपनगरात 2 आणि पश्चिम उपनगरात 8 अशा एकूण 26 ठिकाणी घर किंवा घराच्या भिंतीचा भाग पडला आहे. कोकणात 6 जणांचा मृत्यू  तौत्के चक्रीवादळामुळे कोकणात एकूण 6 मृत्यू झाले आहेत तर 9 जण जखमी झाले आहेत. कोकणातील एकूण 12 हजार 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान सुद्धा या वादळात झाले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cyclone, Mumbai

पुढील बातम्या