मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Cyclone Tauktae: काळजी घ्या! उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

Cyclone Tauktae: काळजी घ्या! उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

Red Alert for Raigad: तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Red Alert for Raigad: तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Red Alert for Raigad: तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, 16 मे: महाराष्ट्राच्या विविध भागांत तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. गोव्यानंतर आता चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणात (Konkan) दिसत आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरीत (Ratnagiri) समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. उद्या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर या जिल्ह्यांना फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळामुळे उद्या म्हणजेच 17 मे 2021 रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड (Red Alert for Raigad) अलर्ट जारी केला आहे. पाहूयात उद्या कुठल्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी असेल.

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट

उद्या रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने विर्तवला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत उद्या अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वाचा: Cyclone Tauktae: चक्रीवादळाच्या संकटाचं सरकारला गांभीर्य नाही का? कोकणात NDRFची एकही टीम नाही

नागरिकांनी घराबाहेर पडू नये

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे.

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई चर्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गस्त घातली जात आहे. दादरच्या किनारपट्टीवर महापालिकेने लाईफ गार्ड तैनात केले असून सात जणांची टीम कुणालाही समुद्रात जाण्यापासून मज्जाव करत आहे.

कोकण आणि गोव्यातील परिस्थिती

उद्या कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहण्याची तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्रात काय असेल स्थिती?

उद्या मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

First published:

Tags: Cyclone, Maharashtra, Mumbai