मुंबई, 19 मे: तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) गुजरातसह (Gujarat) महाराष्ट्राला जोरदार फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून वादळी वारा आणि पावसानं हाहाकार माजवला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला झोडपून काढल्यानंतर सोमवारी सकाळपासून गुजरातमधील उनामध्ये आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात जोरादार पाऊस झाला. गोवा आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातमध्येही किनारपट्टी भागात या वादळामुळे खूप नुकसान झालं. कालपासून वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर या वादळामुळे झालेल्या नुकसानाचे, समुद्रातील भरतीमुळे उसळलेल्या लाटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळचा (Gateway of India) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत समुद्रातील लाटा गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूला धडकताना दिसत आहेत.
Maaaan .....nature's fury has no parallel !
Never ever seen Gateway of India like this in all these years #CycloneTauktae pic.twitter.com/xOg52kBo0i — Sameer (@BesuraTaansane) May 17, 2021
ताज महल हॉटेलपासून शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. खवळलेल्या अरबी समुद्रात (Arabian sea) उसळलेल्या लाटा गेटवे ऑफ इंडियाजवळ ठेवलेल्या बॅरिकेड्सपर्यंत (barricades) येत आहेत. समुद्रातील पाणी किनाऱ्याजवळच्या भागात शिरताना दिसतंय. वादळी वाऱ्याचा आवाज (Sounds of strong winds) आणि समुद्राच्या लाटांची दृश्य भयभीत करणारी आहेत. एकंदरीतच निसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचं या व्हिडिओतून दिसून येतंय. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलंय.
⚡
Stay indoors. Stay safe, Paltan! : @ompsyram#CycloneTauktae pic.twitter.com/JFPqyrMbXG — Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2021
शिवानी नावाच्या एका युझरने म्हटलंय, की ‘ही दृश्य खूप भयावह आहेत. जिथे बोटी दिसायच्या तिथे इतक्या उंच लाटा दिसताहेत.’ तर, मृदुला नावाची युझर म्हणते, की ‘मला तर हा व्हिडिओ बघूनच चक्कर येत आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ अशा लाटा कधीच पाहिलेल्या नाहीत.’ सोशल मीडियावर अनेक नेटकरी वादळाचे व्हिडिओ शेअर करून घरीच राहा आणि सुरक्षित राहा,असं सांगत आहेत.
Another Gateway video. #CycloneTauktae pic.twitter.com/s2KFadpSPO
— Mridula (@mridulasee) May 17, 2021
VIDEO: Lockdown चं उल्लंघन पडलं महागात; भररस्त्यात करावा लागला नागीन डान्स
गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्यानंतर अति तीव्र झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव मंगळवारी थोडा कमी झाला होता. गुजरातमधील सौराष्ट्रात सकाळी 11 किलोमीटर प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत होतं. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आज वायव्य दिशेनं पुढे सरकत आहे. त्यामुळे राज्यातील कोकण (Konkan) आणि गुजरातमधील सौराष्ट्र (Saurashtra), कच्छ (Kutch) तसेच राजस्थानच्या काही भागात तीव्र पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
It's so scary https://t.co/QhLq7LlHWy
— Shivani (@MostlySane007) May 17, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (corona second wave) सामना करणाऱ्या देशाला चक्रीवादळाच्या तडाख्याला सामोरं जावं लागलंय. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळसह आणखी काही राज्यात तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला आहे. अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.