Home /News /mumbai /

cyclone tauktae चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

cyclone tauktae चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तौक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

    मुंबई, 25 मे : मागील आठवड्यात तौक्ते चक्रीवादळाने (cyclone tauktae ) कोकणाच्या समुद्री किनारपट्टीत धुमाकूळ घातला होता. राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला काय मदत जाहीर करणार याकडे सर्वाचं लक्ष लागले होते. अखेर नुकसानग्रस्त भागात निसर्ग चक्रीवादळ (Nisarga cyclone) नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. त्यानंतर 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे  नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 47 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान दरम्यान, तौक्ते चक्रीवादळान अनेक गावात शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. कोकणात किती प्रमाणात नुकसान झाले याबद्दलचा अहवाल कोकण विभागाने सोमवारी सादर केला आहे. एकूण 47 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ना कोणती लस, ना औषध! Whisky पिऊन लोकांनी महासाथीशी दिला लढा तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर पंचनामे करण्यात आले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तौक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी याबद्दल अहवाल सादर केला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. याचे नुकसानहे सर्वाधिक 25 कोटी इतके आहे. तर शेतीचे 16 कोटी 88 लाखांचे नुकसान झाले आहे. मनुष्य हानी - 41 लाख पशुधन - 6 लाख घरगुती वस्तू नुकसान - 11 लाख घरांची पडझड - 25 कोटी जनावराचे  गोठे - 34 लाख मत्या व्यवस्थित -  4 कोटी 84 लाख शेती नुकसान - 16 कोटी 48 लाख एकूण 37 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, पालघर ठाणे सर्व मिळून ही मागणी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या