Home /News /mumbai /

Cyclone Tauktae : मुंबईच्या वेशीवर पोहोचले चक्रीवादळ, धोका टळला पण वादळ वारं सुटलं!

Cyclone Tauktae : मुंबईच्या वेशीवर पोहोचले चक्रीवादळ, धोका टळला पण वादळ वारं सुटलं!

मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पाऊस सुरू आहे...

    मुंबई, 17 मे : गेल्या 3 दिवसांपासून अरबी सुमद्रात धुडगूस घालणारे 'तौक्ते' चक्रीवादळ (Cyclone Tauktae) आता मुंबईपासून (Mumbai) काही किमी अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात याचे परिणाम दिसायला लागला आहे. मुंबईवरचा वादळाचा धोका जरी टळलला असला तरी वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तोक्ते वादळ मुंबईच्या समुद्रीकिनाऱ्यालगत पोहोचले असता प्रभाव कमी झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईपासून 170 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ जाणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 3 वाजेपासून अनेक भागात थांबून थांबून पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळ जेव्हा मुंबई जवळील समुद्रकिनाऱ्यापासून जाईल तेव्हा मुंबई हवेचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे 60 ते 70 किमी/प्रति तासाने वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. दरम्यान,  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळामुळे 17 मे 2021 रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड (Red Alert for Raigad) अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे. तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई चर्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गस्त घातली जात आहे. दादरच्या किनारपट्टीवर महापालिकेने लाईफ गार्ड तैनात केले असून सात जणांची टीम कुणालाही समुद्रात जाण्यापासून मज्जाव करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या