मुंबई, 20 मे: तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात बार्ज भरकटले होते. या दुर्घटनेत आता आणखी 4 जणांचे मृतदेह सापडले आहे. त्यामुळे मृतांची संख्याही 41 वर पोहोचली आहे. तर आणखी 34 जण बेपत्ता आहे. नौदलाचे जवान बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.
मुंबईच्या खोल समुद्रात चार बार्जवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बार्जचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले होते. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने (Indian Navy) युद्धपातळीवर आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आतापर्यंत 611 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.
'फडणवीसांनी अहवाल द्यावा, पंतप्रधान राज्याला 1500 कोटी देतील - राऊत
P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते त्यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केलं आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन कर्मचाऱ्यांना वाचवलं आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आज सकाळी काही कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले होते. तर दुपारी आणखी काही कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले आहे. आतापर्यंत एकूण 41 जणांचे मृतदेह सापडले आहे. आणखी 34 जणांचा शोध सुरू आहे.
कॅप्टनचा निर्णय चुकला आणि 261 कर्मचारी अडकले!
दरम्यान, समुद्रात तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) येणार याची पूर्व कल्पना असतानाही बार्ज P305 च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी चिडल्या; उपस्थित होते 10 CM बोलले फक्त PM
ONGC च्या तेल उत्खनंन प्रकल्पावर काम करण्याचं कंत्राट अॅफकॉन कंपनीकडे होतं. याच अॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी बार्ज P305 वर होते. बार्ज P305 समुद्रातच थांबण्याचे आदेश अँफकाँन कंपनीने दिल्यामुळेच कॅप्टनने चक्रीवादळातही बार्ज P305 भर समुद्रातच कार्यरत ठेवली. अँफकाँन कंपनी आणि बार्ज P305 चा कँप्टन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे 261 लोकांची जीव चक्रीवादळात सापडला. त्यापैकी 188 लोकांचा जीव नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून वाचवला.
चक्रीवादळ सुरू असताना ज्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या ते खोल उधाणलेल्या समुद्रात भरकटत गेले. त्यांच्यापैकी 37 लोकांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागलेत. उर्वरीत 36 लोकांचा शोध आजही नौदल आणि तटरक्षक दलाच्या युद्धनौका आणि त्यावरील जवान घेत आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.