Home /News /mumbai /

Cyclone Tauktae: खवळलेल्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी; देवदूत बनत नौदल आलं धावून; आतापर्यंत 38 जणांची सुटका

Cyclone Tauktae: खवळलेल्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी; देवदूत बनत नौदल आलं धावून; आतापर्यंत 38 जणांची सुटका

Rescue operation of Barge P305: मुंबईला तौत्के चक्रीवादळाने चांगलेच झोडपले. याच दरम्यान बॉम्बे हायजवळ 273 कर्मचारी बार्जमध्ये अडकल्याची माहिती समोर आली.

    मुंबई, 17 मे: तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) अक्षरश: सर्वत्र धुमाकूळ घातला. कोकणासह मुंबईत वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळादरम्यान बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील एका बार्जमध्ये (P 305) तब्बल 273 कर्मचारी अडकल्याची माहिती समोर आली. ही माहिती नौदलाला (Indian Navy) मिळताच रेस्क्यू ऑपरेशन (Rescue operation) सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 38 जणांची सुटका करण्यात आली आहे. P 305 या बार्जवर  एकूण 273 कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी हे कर्मचारी आहे ते ठिकाण मुंबईपासून जवळपास 70 किलोमीटर दक्षिण पश्चिम परिसरात आहे. नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi), आयएनएस तलवार आणि आयएनएस कोलकाता यांच्यामार्फत डायमंड ऑईल फील्डच्या ठिकाणी बेपत्ता झालेल्या पी 305 बोटीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 38 जणांना बचावण्यात आले आहे. अत्यंत खराब हवामान आणि खवळलेला समुद्र त्यातच जोरदार लाटा यामुळे नौदलाला सर्च ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहेत. नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले की, बॉम्बे हाय परिसरात स्थित डायमंड ऑईल फील्डमध्ये पी-305 वरील कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यासाठी नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. माधवाल यांनी पुढे म्हटलं की, बचाव आणि मदतीसाठी INS कोचीला पाठवण्यात आले आहे. 273 कर्मचारी बार्जवर उपस्थित आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि मदतीसाठी आयएनएस तलवार सुद्धा तैनात करण्यात आली आहे. हाजी अली जवळ 11 लहान बोटी बुडाल्याची भीती तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. चक्रीवादळ थेट मुंबईला धडकलं नसलं तरी त्याचा परिणाम हा मुंबईवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. त्यातच आता हाजी आली परिसरात 11 लहान बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai

    पुढील बातम्या