• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Cyclone Tauktae LIVE: चक्रीवादळ जमिनीला धडकलं; प्रचंड वेगवान वाऱ्यांनी गुजरातचा किनारा हलले

Cyclone Tauktae LIVE: चक्रीवादळ जमिनीला धडकलं; प्रचंड वेगवान वाऱ्यांनी गुजरातचा किनारा हलले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 17, 2021, 20:01 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  आज बाधित रुग्णसंख्या कमी, मृत्यूसंख्याही कमी
  राज्यात दिवसभरात 48,211 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 26,616 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 516 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 90.19, मृत्युदर 1.53 टक्के
  राज्यात सध्या 4 लाख 45,495 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:48 (IST)

  मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट
  मुंबईत दिवसभरात 2,587 रुग्णांना डिस्चार्ज
  मुंबईत दिवसभरात 1,240 रुग्णांची नोंद

  20:42 (IST)

  नाशिक - रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरण
  नाशिक पोलिसांनी केलं रॅकेट उद‌्ध्वस्त
  3 नर्सेससह टोळीकडून आणखी 20 इंजेक्शन जप्त
  तपासात या प्रकरणाचं पालघर कनेक्शन उघड
  पालघरमधून आणखी 4 आरोपी ताब्यात, एकूण संख्या 8
  आडगाव पोलिसांची दबंग कामगिरी
  राज्यातील मोठी टोळी उघड होण्याची शक्यता

  20:22 (IST)

  मुंबई - विमानतळावरील 56 उड्डाणं रद्द
  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
  सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विमानतळ बंद
  मुंबईत येणाऱ्या 7 फ्लाईट इतर ठिकाणी वळवल्या
  काही एअरलाईन्सनं आपली उड्डाणं केली रद्द

  20:17 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

  20:17 (IST)

  लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

  20:17 (IST)

  म्युकरमायकोसिसचा महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत समावेश; म्युकरमायकोसिसवरील औषधोपचारासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध - अजित पवार

  20:3 (IST)

  Cyclone Tauktae LIVE:  चक्रीवादळ जमिनीवर धडकलं

  गुजरातच्या किनाऱ्यावर झाला Landfall

   

  19:45 (IST)

  ठाणे - तौक्ते वादळाचा फटका कोविड सेंटरला
  तात्पुरत्या कोविड सेंटरमधून 22 रुग्णांना हलवलं
  दिव्याच्या खारेगाव कोविड सेंटरमधील घटना

  18:55 (IST)

  नाशिक - सलग चौथ्या दिवशी रुग्ण 2 हजारांखाली
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1781 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1723 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स