मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update: शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; येत्या 4 दिवसांत राज्यात धुव्वाधार पावसाची शक्यता

Weather Update: शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; येत्या 4 दिवसांत राज्यात धुव्वाधार पावसाची शक्यता

Weather Latest Update: अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीन चक्रीवादळ पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Weather Latest Update: अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीन चक्रीवादळ पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Weather Latest Update: अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीन चक्रीवादळ पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 01 ऑक्टोबर: बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने (Cyclone Gulab) भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडक दिल्यानंतर, आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा (Cyclone Shaheen alerts) धोका निर्माण झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नाही. पण गुजरातच्या किनारपट्टीवर याचा काहीअंशी परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ सध्या भारतीय किनारपट्टीपासून आखाती देशांच्या किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. हे वादळ पुढील काही तासांत तीव्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

परिणामी पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता (Rain In Maharashtra) आहे. हवामान खात्याने (IMD) आज कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट (Yellow Alerts) जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघर्जनेसह वादळी वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असलं तरी, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाहीन चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि सौराष्ट्रच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय आज रात्री किंवा शनिवारी पहाटेपर्यंत शाहीन चक्रीवादळ तीव्र रुप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-वाह! लहान मुलांसाठी चांगली बातमी; लवकरच मिळेल लस, पुण्यात ट्रायल सुरु

त्यामुळे मच्छिमारांना 3 ऑक्टोबर पर्यंत मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शाहीन चक्रीवादळ सध्या 15 किमी प्रतितास वेगाने भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातमधील द्वारकापासून पश्चिम उत्तर दिशेला 490 किमी, इराणमधील चारबहार बंदरापासून पूर्व-दक्षिणेला हे चक्रवादळ 450 किमी अंतरावर आहे. तर आमानच्या मस्कटपासून पूर्व दक्षिणेला 610 किमी अंतरावर हे वादळ आहे. पुढील काही तासांत या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र