समुद्रातून जमिनीकडे घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा तो VIDEO खरा की खोटा?
समुद्रातून जमिनीकडे घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा तो VIDEO खरा की खोटा?
जमिनीच्या दिशेने घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या VIDEO मध्ये चक्रीवादळाचं केंद्रक किंवा Eye of Cyclone दिसतो असं म्हटलं गेलं. पण आता हा VIDEO िनसर्ग चक्रीवादळाचा नाहीच असं स्पष्ट झालं आहे.
मुंबई, 3 जून : चक्रीवादळांपासून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक वर्षांनी निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. निसर्ग चक्रीवादळाने दिवेआगर ते अलिबाग दरम्यान जमिनीवर प्रवेश केला. निसर्ग चक्रीवादळाचा लँडफॉल झाल्यानंतर लगेच जमिनीच्या दिशेने घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे, असं म्हणत एक VIDEO दाखवण्यात आला. यामध्ये चक्रीवादळाचं केंद्रक किंवा Eye of Cyclone स्पष्ट दिसतो आहे, असं सांगितलं गेलं. पण हा VIDEO खरा नाही, असं आता स्पष्ट होत आहे.
समुद्रात घोंघावणाऱ्या आणि जमिनीकडे येणाऱ्या चक्रीवादळाचा धडकी भरवणारा VIDEO News18 कडे सरकारी सूत्रांकडून आला असला तरी व्हिडीओमध्ये दिसतंय त्याला चक्रीवादळाचा केंद्रबिंदू किंवा Eye of Cyclone नाही. या VIDEO मध्ये दिसणारं दृश्य waterspout किंवा उर्ध्व दिशेने जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचं आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. बाष्पयुक्त ढग फनेल शेप घेऊन अशा प्रकारे चक्रवाती स्वरूप धारण करू शकतो.
पण हा waterspout निसर्गाचं हे स्वरूप धडकी भरवणारं आहे हे निश्चित.
निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू Eye of Cyclone... प्रथमच समोर आला समुद्रातून जमिनीवर धडकणाऱ्या वादळाचा VIDEO pic.twitter.com/5JCTN9IIjq
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.