News18 Lokmat

Cyclone in Mumbai : 'वायू'चा फटका; बांद्र्यात स्कायवॉकवरची शीट कोसळून 3 महिला जखमी, चर्चगेटला एकाचा मृत्यू

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं, खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. चर्चगेटला होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर बांद्र्याला स्कायवॉकची मेटल शीट अंगावर पडल्याने तिघी जखमी झाल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 05:00 PM IST

Cyclone in Mumbai : 'वायू'चा फटका; बांद्र्यात स्कायवॉकवरची शीट कोसळून 3 महिला जखमी, चर्चगेटला एकाचा मृत्यू

मुंबई, 12 जून :  अरबी समुद्रात निर्माण झालेलं वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यादिशेने आगेकूच करत आहे. मुंबईपासून हे वादळ काही अंतरावर असलं, तरी त्याचे परिणाम मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसत आहेत. बुधवार सकाळपासूनच मुंबईत विशेषतः किनारी भागात प्रचंड वेगाने वारे वाहात आहेत. वांद्र्यातल्या एस. व्ही. रोड इथे स्कायवॉकवरची मेटल शीट पडून ३ मुली जखमी झाल्या.मेलीसा नजारत, सुलक्षणा वझे, तेजल कदम अशी जखमी महिलांची नावं आहेत.  'वायू' चक्रीवादळामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंग कोसळलं. यात 62 वर्षांच्या मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू ओढवला आहे.

मुंबईत जोरदार वारे आणि पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच मुंबईकरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकलं असलं तरी मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

पालघरमध्ये पुलाचं गर्डर झुकल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या रद्द

'वायु' चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटाही उसळल्या आहेत. किनाऱ्यालगत असलेल्या कोळीवाड्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी समुद्राबाहेर काढल्या आहेत. माहीम कोळीवाड्याजवळ समुद्रात उभ्या असणाऱ्या तीन मासेमारी बोटी समुद्रात वाहून गेल्या.

Loading...

पश्चिम रेल्वेला फटका 

वादळी वारे आणि पावसाचा फटका पश्चिम रेल्वेलाही बसला आहे. पालघरमध्ये एका रेल्वेवरून जाणाऱ्या पुलाचं गर्डर लावत असताना ते एक बाजूला वळलं. त्यामुळे पालघरहून येणाऱ्या गाड्या रद्द झाल्या. लांब पल्याच्या काही गाड्यांची वाहतूकही दुसरीकडे वळवण्यात आली आहे.

जास्त वेळा वीज गेली तर आता मिळणार पैसे, मोदी सरकारची ही आहे योजना

अरबी समुद्रात निर्माण झालेलं 'वायू' चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे. हे वादळ 13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़. या वादळाचा फटका गुजरातमध्ये कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर इथे बसू शकतो.

किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही वायू चक्रीवादळामुळे सतर्केतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे अरबी समुद्रात उंचचउंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...