मुंबई, 19 एप्रिल: देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात पोर्न अर्थात अश्लिल व्हिडीओ पाहाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा लोकांवर सायबर ठग बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्या ईमेल करून त्यांना खंडणीसाठी धमकी दिली जात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने दिलेली माहिती अशी की, इंटरनेटवर विविध अश्लिल वेबसाइट्स सर्च करणाऱ्यांना खंडणीसाठी ईमेल मिळत आहेत. अशा लोकांकडे खंडणीच्या रुपात बिटक्वाइनची डिमांड अर्थात मागणी केली जात आहे. डिमांड पूर्ण न केल्यास अश्लिल वेबसाइट पाहतानाचा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात आहे.
हेही वाचा...महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात 7 मेपर्यंत लॉकडाऊन, ऑनलाइन फूड सर्व्हिसही बंद
महाराष्ट्र सायबर शाखेचे पोलिस अधीक्षक बालसिंह राजपूत यांनी सांगितलं की, हॅकर्सनी बहुतांश पोर्न वेबसाइट्सवर मालवेअर (असे सॉफ्टवेअर जे एखाद्ये कॉम्प्यूटर अथवा व्यक्ती अथवा सर्व्हरला नुकसान पोहाचवण्याच्या उद्देशाने तयार केला जाते) कोणी या वेबसाइट्सवर व्हिजिट केल्यास हॅकर्स संबंधित व्यक्तीची माहिती गोळा केली जाते.
यानंतर ब्राउजर रिमोट कंट्रोलप्रमाणे काम करते. यामाध्यमातून हॅकर्स पोर्न वेबसाईट पाहणाऱ्याच्या स्क्रीनपर्यंत पोहोचतात. संबंधित व्यक्तीच्या मित्रांचे फोननंबर, सोशल मीडिया आणि ईमेलवर ओळखणाऱ्यांचा डेटा घेतात.
हेही वाचा.. आत्ताच सोडा या सवयी नाहीतर तुम्हालाही होऊ शकतो कोरोनाअशी मिळतेय धमकी
पोलिस अधीक्षक बालसिंह राजपूत यांनी सांगितलं की, हॅकर्स आधी संबंधित व्यक्तीला ई-मेलवर धमकीका संदेश पाठवतात. 'आमच्याकडे तुझा पोर्न साइट पाहतानाचा व्हिडीओ आहे. बिटक्वाइनच्या माध्यनातून रक्कम न दिल्यास तो आम्ही सार्वजनिक करु' अशी धमकी देतात.
दरम्यान, मुंबईत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली हे. अशाच धमकीचा ईमेल मुंबईतील एका व्यक्तीला आला आहे. हॅकर्सने त्याला 2900 डॉलरची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न केल्यात वेबकॅमने रेकॉर्ड केलेल त्याचा व्हिडीओ त्याचे मित्र, नातेवाईक तसेच सहकाऱ्यांना पाठवला जाईल, असी धमकी मिळाली आहे.
संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.