S M L

'जेएनपीटी'वर सायबर हल्ला, बंदराचं कामकाज ठप्प !

भारतातील सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटीला रॅनसमवेअर व्हायरसचा फटका बसलाय. रॅनसमवेअर व्हायरसच्या अॅटॅकमुळे जेएनपीटी बंदराची कार्यप्रणाली ठप्प झाली आहे परिणामी सध्या जेएनपीटी बंदराचे सर्व व्यवहारही ठप्प झालेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 10:49 AM IST

'जेएनपीटी'वर सायबर हल्ला, बंदराचं कामकाज ठप्प !

28 जून : भारतातील सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटीला रॅनसमवेअर व्हायरसचा फटका बसलाय. रॅनसमवेअर व्हायरसच्या अॅटॅकमुळे जेएनपीटी बंदराची कार्यप्रणाली ठप्प झाली आहे परिणामी सध्या जेएनपीटी बंदराचे सर्व व्यवहारही ठप्प झालेत. खरंतर युरोपीय देशांमधून या सायबर अटॅकला सुरूवात झालीय. इकडे भारतातही त्याचा फटका बसलाय. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसनं गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता  पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे.

मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे,  यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आलंय.हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.

'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?

तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप सुरू केल्यानंतर त्यावर एक मेसेज येतो की, तुमचा संगणक आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनला क्लिक करून खंडणीची रक्कम या बँक खात्यात भरा अन्यथा तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या पीसीचा ताबा हा आता हॅकर्सने घेतलेला असतो. कारण तुमची ऑपरेटिंग सिस्टमच सुरू होत नाही. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात.

Loading...
Loading...

कसा रोखावा सायबर हल्ला ?

१. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये अपडेटेड आणि उत्तम दर्जाचा अ‍ॅन्टीव्हायरस इन्स्टाल करून घ्या.

२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .

3. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .

स्मार्टफोनलाही धोका ?

संगणकांप्रमाणे स्मार्टफोनला ही हॅकिंगचा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोनवर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठीसुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे अॅप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या. शक्यतो गुगल प्ले वरूनच अॅप इन्स्टाल करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 10:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close