News18 Lokmat

मुंबईतील स्टेट बँक आॅफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर मारला डल्ला

मुंबईतील नरिमन पॉईंट इथं स्टेट बँक ऑफ मॉरिशसची शाखा आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2018 12:29 PM IST

मुंबईतील स्टेट बँक आॅफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर मारला डल्ला

मुंबई, 12 आॅक्टोबर : स्टेट बँक आॅफ मॉरिशसच्या मुंबईतील शाखेवर सायबर हल्ला झाल्याची बाब समोर आलीये. सर्व्हरवर हल्ला करून तब्बल १४३ कोटी गहाळ झाल्याचा दावा बँकेनं केलाय.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथं स्टेट बँक ऑफ मॉरिशसची शाखा आहे. या शाखेवर अमेरिकेतील हॅकर्सने हल्ला केल्याचं कळतंय. हॅकर्सनी १४३ कोटींची रोकड लंपास केलीये. या प्रकरणी शाखेने यासंबंधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवलीये.

बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत. सध्या पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दोन महिन्यापूर्वीही पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या हेडक्वार्टरमधून सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हॅक करण्यात आल्याची घटना घडली होती. फेक ट्रान्झेक्शनच्या माध्यामतून ही रक्कम वळवण्यात आले होते. जवळपास 500 जणांच्या खात्यातून यातील जवळपास 72 कोटी रूपये हाँगकाँगच्या बँकेमध्ये वर्ग करण्यात आलेत. या प्रकरणी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या सायबर सेलकडे तक्रार केलीय.

Loading...

एटीएम आणि पास सारख्या सेवांमध्ये वापरला जाणारा डेटा ज्या ग्राहकांसाठी आहे तो चोरून हा सगळा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. त्यासाठी ग्राहकांना जे मेसेजस पाठवले जातात, तसेच मॅसेज हॅकरने व्हर्चुअल मेसेज पाठवून बँकेची परवानगी घेतल्याचा आभास निर्माण करून हे सगळे व्यवहार केल्या गेल्याचं समोर आलं आहे. कॉसमॉस बँकेच्या जवळपाल ५०० खातेदारांच्या १३ हजार फेक ट्रान्सॅक्शनद्वारे 94 कोटी रुपये विदेशात ट्रान्स्फर केले.

=========================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...