SPECIAL REPORT : 'गुडविन ज्वेलर्स'ने काय दिली होती स्किम, का फरार झाले मालक?

SPECIAL REPORT : 'गुडविन ज्वेलर्स'ने काय दिली होती स्किम, का फरार झाले मालक?

गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात सुमारे शंभर नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

अजित मांढरे आणि मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 28 ऑक्टोबर : गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात सुमारे शंभर नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर 50 कोटींची खंडणी मागितल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थळी असल्याचं गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी स्पष्ट केलंय. तसंच ग्राहकांचे पैसे परत करण्याचा शब्दही देण्यात आला.

गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात ग्राहक तक्रारी दाखल करत आहेत. 18 टक्के दरानं व्याज देण्याचं आमिष सुनील नायर आणि सुधीर नायरनं दाखवलं होतं. त्यांच्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवला. मात्र, ते दोघेच फरार झाले. पण आता त्या दोघांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात 50 कोटींची खंडणी मागण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संपत्ती विकून ग्राहकांचे पैसे परत करू, असा दावाही त्यांनी केला.

ग्राहकांनी सोनं, हिरे आणि भिशीमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, आता गुडविन ज्वेलर्सला टाळं लागल्यानं ग्राहकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. लाखोंची गुंतवणूक केल्यानं ग्राहक हवालदिल झाले आहे.

पोलिसांनी या प्रकणाचा तपास सुरू केला आहे. फसवणुकीच्या रक्कमेचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जास्त व्याजाचं आमिषानं ग्राहक त्यांचे कष्टाचे पैसे गुंतवतात. मात्र कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी ग्राहकांनी सर्व बाबी तपासून घेण्याची गरज आहे.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या