गुगल मॅपवरून साभार...
या रेस्टाॅरंटमध्ये दररोज साधारणपणे 300 ग्राहक भेट देत आहेत, तर सुट्टीच्या दिवशी 450 पर्यंत ग्राहक भेटी देत आहेत. साधं जेवण, नाश्ता, वडापाव, सॅंडविच, पंजाबी, चायनिज पदार्थ मिळतात. सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 18 च्या अगदी शेवटी हे रेस्टाॅरंट उभं केलेलं आहे. या रेस्टाॅरंटला भेट द्यायची असेल 9004532962 मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता. ग्राउंड, सीएसएमटी, प्लॅटफॉर्म क्रमांक 18, पी डी'मेलो रोड, मुंबई, महाराष्ट्र 400009 या पत्त्यावर हे हाॅटेल आहे. वाचा : बीडच्या ‘या’ हाॅटेलमध्ये 60 वर्षांपासून चक्क चहाच्या बशीत दिली जाते पुरीभाजी; पहा या चटकदार पदार्थाचा VIDEO ग्राहक अनुष्का अर्बन म्हणाल्या की, "मी पहिल्यांदाच या रेस्टाॅरंट भेट दिलीय. खूप छान हाॅटेल असून सेवाही उत्तम आहे. पदार्थांची चवदेखील उत्तम आहे. खूप छान अनुभव आहे." हाॅटेलचे व्यवस्थापक शैलेश नारकर म्हणाले की, "हे रेस्टॉरंट 18 ऑक्टोबर 2021 रोजी सूरु झालं. इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. जुन्या कोचला नवीन रूप देत या रेस्टॉरंटची निर्मिती केली आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण तसेच रात्रीचंदेखील जेवण मिळतो. एकंदरीत ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे."मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai local