CSMT पूल दुर्घटना: पालिकेचे मुख्य आणि सहाय्यक अभियंता निलंबित

CSMT पूल दुर्घटना: पालिकेचे मुख्य आणि सहाय्यक अभियंता निलंबित

सीएसएमटी जवळच्या पूल दुर्घटनेप्रकरणी महानगरपालिकेने मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च: सीएसएमटी जवळच्या पूल दुर्घटनेप्रकरणी महानगरपालिकेने मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 30हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस, मनसे आणि अन्य पक्षांनी केली होती.

संबंधित बातमी: Mumbai: पादचारी पूल दुर्घटनेला पालिकाच जबाबदार, हा घ्या पुरावा

पाटील आणि काळुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करताना निवृत्त मुख्य अभियंता एस.ओ.कोरी आणि निवृत्त उपमुख्य अभियंता आर.बी तारे यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच देसाई असोसिएटने केलेल्या पुलाचे पुन्हा ऑडिट केले जाणार आहे.

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी रात्री पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यात 3 महिलांचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. पूल दुर्घटनेला मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचे या ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. काहीच दिवसांपूर्वी अंधेरीत एका पुलाचा काही भाग कोसळला होता. त्याच्याआधी या पुलाचे ऑडिट करण्यात आले होते. 1981 साली हा पूल बांधण्यात आला होतो. तेव्हापासून याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे.

Mumbai Bridge Collapse : सनदशीर मार्ग प्रशासनाला समजत नाही, राज ठाकरेंचं खरमरीत पत्र

ऑडिट रिपोर्टनुसार पालिकेला पुलाची दुरुस्ती करण्यास सांगितली होती. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. जर ऑडिट रिपोर्टनुसार पुलाची दुरुस्ती केली असती तर गुरुवारी रात्री झालेली दुर्घटना टळली असती. या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच आझाद पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 304 ए नुसार मध्य रेल्वे आणि पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या