'पुतळे बांधण्यासाठी पैसे आहेत पण लोकांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडे वेळ नाही'

'पुतळे बांधण्यासाठी पैसे आहेत पण लोकांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडे वेळ नाही'

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुल दुर्घटनेप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पूल दुर्घटनेप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या दुर्घटनेला मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केला आहे. याआधी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आम्ही सरकारकडे मुंबईतील सर्व पुलांचे अॅडिट करुन त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. पण सरकारला जाग आली नाही, असे ही पठाण म्हणाले.

LIVE Mumbai Bridge Collapse : CSMT पादचारी पूल कोसळला : 3 ठार; किमान 34 जखमी

या पुलाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई पालिकेकडे होती. पालिकेकडे 35 हजार कोटींचे बजेट आहे. पण त्यांना या पुलाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकारला पुतळे बांधण्यासाठी वेळ आहे. पण सर्व सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी वेळ नाही. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना तातडीने निलंबित करावेत, अशी मागणी पठाण यांनी केली.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकार आर्थिक मदत करेल पण त्याचा उपयोग नाही असे पठाण म्हणाले. सरकारने अॅडीट केले पण दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.


या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
संबंधित बातमी-

PHOTO थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल

मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO


मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या