सीएसएमटी पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरीडॉरचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता

या कॉरीडॉरवर दर तीन मिनिटांनी आठ डब्यांची एक ट्रेन सोडण्याची योजना आहे. या मार्गाचं शेवटचं स्थानक सध्याच्या सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या फलाट क्र. 18 जवळ बांधण्यात येणार आहेत

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2017 02:16 PM IST

सीएसएमटी पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरीडॉरचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता

मुंबई,04 डिसेंबर: सीएसएमटी ते पनवेल एलिवेटेड फास्ट कॉरीडॉरला रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा एकदा चालना दिली आहे. 47 कि.मी.च्या एलिवेटेड कॉरीडॉरवर एकूण 11 स्थानके असणार आहेत.

या कॉरीडॉरवर दर तीन मिनिटांनी आठ डब्यांची एक ट्रेन सोडण्याची योजना आहे. या मार्गाचं शेवटचं स्थानक सध्याच्या सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या फलाट क्र. 18 जवळ बांधण्यात येणार आहेत. 11 स्थानकांपैकी वाशी, खारघर आणि पनवेल ही तीन स्थानके जमिनीवर बांधण्यात येणार असून उर्वरित आठ स्थानके उन्नत असणार आहेत.

या मार्गावर सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, एलटीटी, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर आणि पनवेल अशी एकूण अकरा स्थानके असणार आहेत. तसेच वाशी, खारघर व पनवेल ही तीन स्थानके जमिनीवर बांधण्यात येणार आहेत तर सीएसएमटी हे स्थानक लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या फलाट क्र.18 जवळील पी. डीमेल्लो मार्गावर उन्नत स्वरूपात दुसऱ्या मजल्यावर असणार आहे. हार्बरचा मार्ग पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी वापरण्याची योजना असून हार्बरचे शेवटचे स्थानकही इथेच एलिवेटेड स्वरूपात पहिल्या मजल्यावर असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...