CSMT पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक; निवृत्त सब इंजिनिअर गजाआड

CSMT येथील हिमालय पुल दुर्घटना प्रकरणात आता निवृत्त सब इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 12:26 PM IST

CSMT पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक; निवृत्त सब इंजिनिअर गजाआड

मुंबई, प्रणाली कापसे, 07 मे : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 14 मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 34 जण जखमी झाले होते. याप्रकरणी आता चौथी अटक करण्यात आली आहे. शितला प्रसाद कोरी असं अटक केलेल्या सब इंजिनिअरचं नाव आहे. सब इंजिनिअर शितला प्रसाद कोरी दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शितला प्रसाद कोरी यांच्या कार्यकाळात पुलाची पाहणी केली गेली होती. त्या पाहणी अहवालावरती कोरी यांची सही देखील आहे. त्यामुळे कामात कसूर झाल्यानं जबाबदार ठरवत शितला प्रसाद कोरी यांना अटक करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली होती. यापूर्वी महापालिकेनं दोन मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 1981 साली हा पूल बांधण्यात आला होता. तेव्हापासून याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे.


अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

सुशोभीकरणामुळे कोसळला पूल?

दरम्यान, हा पूल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुशोभीकरणावेळी पुलावर आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या. यामुळे पुलावरील भार वाढला आणि पूल कोसळला असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Loading...

देशातील अनेक पर्यटनस्थळांची स्वच्छ भारत अभियानाची निवड करण्यात आली होती. यात सीएसएमटी परिसराची निवड झाली होती. या अभियानांतर्गत प्रशासनाने हिमालय पुलाचे सुशोभीकरण, पदपथ दुरुस्ती, रंगकाम करण्याचा निर्णय घेतला होता. हिमालय पुल चांगला दिसण्यासाठी त्यावरील लाद्या बदलण्यात आल्या. 14 लाख रुपयांचा खर्च करताना पुलावर वाढणाऱ्या भाराची मात्र कोणतीही काळजी घेतली गेली नाही. याचाच परिणाम म्हणजे पुल कोसळला असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.


VIDEO: किती जागा जिंकून येतील याबाबत मी कधीच रॅलीत बोललो नाही- अमित शहा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: csmt
First Published: May 7, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...