६५४ केबिन्स,2 स्विमिंग पूल,शाॅपिंग सेंटर आणि थिएटरही, 'मुंबई टू मालदीव' क्रुझ सेवा सुरू !

६५४ केबिन्स,2 स्विमिंग पूल,शाॅपिंग सेंटर आणि थिएटरही, 'मुंबई टू मालदीव' क्रुझ सेवा सुरू !

मुंबई ते मालदीव असा 8 दिवसाचा हा प्रवास असणार आहे, या व्यतिरिक्त चेन्नई चार दिवस, आणि मुंबईत समुद्रात तीन दिवसांचा पर्याय ही नव्या क्रूझ मध्ये देण्यात येणार आहे

  • Share this:

25 नोव्हेंबर : महाराष्ट्रात क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने, एमपीटी कोस्टा क्रुझसोबत करार केलाय. या करारअंतर्गत पहिली कोस्टा क्रूझ मुंबईत दाखल झालीय. मुंबई मालदीव अशी आठ दिवसांची पर्यटन टूर असेल.

मुंबई ते मालदिव्ह्ज व्हाया कोचिन या कोस्टा निओक्लासिकाच्या पहिल्या जलप्रवासाची घोषणा करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या जलप्रवासाची सुरुवात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली. ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. या पुढाकारामुळे नव्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि क्रुझ बंदर विकसित होण्यासाठी चालना मिळणार आहे.  क्रुझसाठीची मागणी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे आणि २०३१-३२ सालापर्यंत स्थानिक क्रुझ प्रवाशांची संख्या तब्बल १.५ दशलक्ष एवढी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील चार महिने मुंबई बंदर हे या इटालिअन क्रुझ लायनरचे आश्रयस्थान असेल आणि नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत साप्ताहिक जलप्रवास केला जाईल. कोस्टा क्रुझने त्यांच्या निओ कलेक्शनमधील कोस्टा निओक्लासिका हे जहाज त्यांच्या भारतीय प्रवासी कार्यक्रमासाठी तैनात केले आहे. या क्लासिक क्रुझ जहाजात ६५४ केबिन्स आहेत. यात समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सुटचाही समावेश आहे. हे जहाज कॅसिनो, चित्रपटगृह, डिस्को, बॉलरूम, ग्रँड बार यांनी सुसज्ज आहे.

वेलनेस सेंटर १३०० चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यात जिम, ट्रीटमेंट खोल्या, सोना आणि स्टीमसाठीची खोली समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आउटडोअर जॉगिंग ट्रॅक, ४ जॅकुझी आणि २ पोहण्याचे तलाव आहेत. ज्यांना शॉपिंगचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी भव्य असे ड्युटी फ्री शॉपिंग सेंटरही आहे. त्याचप्रमाणे वाचकांसाठी उत्तम आणि वैविध्यपूर्ण पुस्तकांचा संग्रह असलेले सुसज्ज वाचनालय आहे.

मुंबई ते मालदीव असा 8 दिवसाचा हा प्रवास असणार आहे, या व्यतिरिक्त चेन्नई चार दिवस, आणि मुंबईत समुद्रात तीन दिवसांचा पर्याय ही नव्या क्रूझ मध्ये देण्यात येणार आहे. समुद्र सफारी साठी विदेशात जाणाऱ्यांना आता मुंबईत मोठा पर्याय उभा राहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 04:50 PM IST

ताज्या बातम्या