बापरे! मुंबईतल्या लोकलमध्ये तुफान गर्दी, कोरोनाचा प्रसार होण्याची भीती

बापरे! मुंबईतल्या लोकलमध्ये तुफान गर्दी, कोरोनाचा प्रसार होण्याची भीती

लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

  • Share this:

मुंबई 23 जून: मुंबईत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता पूर्वीसारखीच गर्दी या लोकल ट्रेन्समध्ये (Mumbai Locals) होत असून सगळ्या गाड्यांमध्ये तुडूंब गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा (corona) प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या ही मुंबईत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे आता ही गर्दी रोखायची कशी असा प्रश्न राज्य सरकारपुढे आहे.

आज देखील रेल्वे ही परिस्थिती कायम होती. आज दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत लोकल गाडी निघाली तेव्हा जी गर्दी होती तीच गर्दी गाडीने ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यावर ही कायम होती. लाॅकडाऊनच्या आधी ज्या प्रमाणे रेल्वे लोकलला गर्दी व्हायची त्याच प्रमाणे आजही तशीच गर्दी रेल्वेत होत आहे.

त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सोशल डिस्टंसिंग, बसलेल्या तसच उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये अंतर ठेवावे हे साधे नियम देखील पाळले जात नाहीत.

पुण्यासाठी Good News बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण वाढलं, 60 टक्क्यांव प्रमाण

लाॅकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कारण जर लाॅक डाऊन काळात रेल्वे सेवा सुरु ठेवली असती तर नागरीकांनी नियम न पाळता रेल्वेनं प्रवास करुन करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवला असता. पण अत्यावश्यक सेवेत काम करणारे असे लाखो कर्मचारी आहेत जे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात राहतात त्यामुळे  अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कामावर येणं कठीण होवून बसलं होतं.

मोदी सरकारने पाकिस्तानबाबत घेतला सर्वात मोठा धाडसी निर्णय, दिलेत हे आदेश

शेवटी अनलाॅक नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांकरता रेल्वे सेवा सुरु केली मात्र हीच सेवा आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना करोनाच्या दारात घेवून चालली आहे अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 23, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading