गावी परतणाऱ्या मजुरांची कुर्ला स्टेशनवर तोबा गर्दी, लॉकडाऊनच्या भीतीने धरली परतीची वाट

गावी परतणाऱ्या मजुरांची कुर्ला स्टेशनवर तोबा गर्दी, लॉकडाऊनच्या भीतीने धरली परतीची वाट

परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या भीतीनं पुन्हा आपल्या मूळ गावाकडं परतण्यास सुरुवात केलीय. मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर अशाच स्थलांतरीत मजुरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : राज्यात कोरोनाच्या (Increasing Corona Cases in Maharashtra) वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या भीतीनं पुन्हा आपल्या मूळ गावाकडं परतण्यास सुरुवात केलीय. मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर अशाच स्थलांतरीत मजुरांची (Migrant Workers) प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी मजूर मोठ्या संख्येने आल्याचं पाहायला मिळालं.

राज्यात बुधवारी रात्रीपासूनच पुन्हा एकडा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या लॉकडाऊनमध्ये झाले तसे हाल होऊ नये म्हणून परराज्यातील मजुरांनी पुन्हा गावचा रस्ता धरला आहे. यात नेहमीच्या रेल्वेंबरोबरच काही स्पेशल ट्रेनदेखिल आज रवाना होणार आहेत. त्या पार्श्नभूमीवर आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांची मोठी गर्दी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर पाहायला मिळाली. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी आपलं गाव गाठण्यासाठी या मजुरांनी परतीचा मार्ग स्वीकारला आहे. कुर्ला स्टेशनवरून मंगळवारी एकूण 23 रेल्वे रवाना होणार आहे. त्यामुळं यातून प्रवास करणाऱ्या मजूर, कामगार यांची गर्दी कुर्ला स्टेशनबाहेर होती.

(हे वाचा -Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो', वसई-विरारचं भीषण वास्तव )

मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मात्र ही गर्दी अचानक झालेली नसल्याचं म्हटलंय. उन्हाळ्यात सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वे आणि दैनंदिन गाड्यांमधीलच हे सर्व प्रवासी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काही विशेष रेल्वे सोडल्या जात असतात. त्यामुळं ही गर्दी उन्हाळ्यात गावी जाणाऱ्यांची आहे असं ते म्हणाले. नेहमीच्या गर्दी प्रमाणेच ही गर्दी असल्याचं त्यांनी म्हटलं. ज्या प्रवाशांचे कन्फर्म बुकींग असेल त्यालाच प्रवासाची परवानगी असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच गर्दीचा विचार करून जवळपास सहा स्थानकांवरील तिकिट काऊंटर बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

(हे वाचा -BREAKING: आजच लॉकडाऊनची घोषणा होणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची माहिती )

कुर्ला स्टेशनबाहेर असलेली ही गर्दी अचानक झालेली गर्दी नसली तरी कोरोनाच्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी जमल्यानं संसर्गाचा धोका वाढणार आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन याठिकाणी होत नसल्याचं दिसून आलं. त्यासाठी काही व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. त्यामुळं प्रशासनानं अशा गर्दीची शक्यता लक्षात घेता उपाय योजना करण्याचा विचार करणं गरजेचं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 3:41 PM IST
Tags: railway

ताज्या बातम्या