मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, मुंबई आणि ठाण्यात पोहोचला बर्ड फ्लू!

मोठी बातमी, मुंबई आणि ठाण्यात पोहोचला बर्ड फ्लू!

 परभणीमध्ये बर्ड फ्लूने (bird flu) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai) बर्ड फ्लूने एंट्री केली.

परभणीमध्ये बर्ड फ्लूने (bird flu) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai) बर्ड फ्लूने एंट्री केली.

परभणीमध्ये बर्ड फ्लूने (bird flu) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai) बर्ड फ्लूने एंट्री केली.

मुंबई, 11 जानेवारी : महाराष्ट्रात (Maharashtra) परभणीमध्ये बर्ड फ्लूने (bird flu) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai) बर्ड फ्लूने एंट्री केली आहे. मुंबई आणि ठाण्यात (Thane) मृत पावलेल्या पक्षांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा स्वॅब घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठवण्यात आला होते. त्याचे अहवाल आज आले आहेत. यात दोन्ही कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

IND vs AUS:  सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात टीम इंडियाला यश

तसंच 9 जानेवारी रोजी ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.  बगळा जातीतील हे पक्षी रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. स्थानिकांनी या घटनेबद्दल पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर ठाणे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मृत पक्षांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्वॅब घेऊन ते भोपाळ इथं पाठवले होते. आज त्याचा अहवाल आला असून बर्ड फ्लूमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  यात 3 पाण बगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

परभणीत बर्ड फ्लूमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू

दरम्यान, परभणीतील मुरुंबा गावातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यानंतर आता प्रशासनाने खबदारी म्हणून पावलं उचलली आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून मुरुंबा गावातील 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला त्याच्या 1 किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.

गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

अपघाताची पाहणी करणाऱ्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला कंटेनरने चिरडले, VIDEO

तसंच, मुरुंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

First published:
top videos