पावसाचा फटका, रस्त्यावर अवतरली मगर

. पवई तलावातून थेट रस्त्यावरच मगर आल्याचं दृश्य पाहण्यास मिळालं.

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2017 09:22 AM IST

पावसाचा फटका, रस्त्यावर अवतरली मगर

30 आॅगस्ट : मुंबईत काल मंगळवारी मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. या पावसाचा फटका मगरीनाही बसलाय. पवई तलावातून थेट रस्त्यावरच मगर आल्याचं दृश्य पाहण्यास मिळालं.

विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर पवई तलावात याआधीही मगर असल्याचं स्पष्ट झालंय. कित्येक वेळा मगरी तलावातील छोट्या बेटावर दिसून येत्यात. "तलावात मगरी आहेत, पाण्यात उतरू नये, सावधानता बाळगा’ असे संदेश देणारे फलक पवई तलावा जवळील अनेक भागात लावलेले आहेत. काल मुसळधार पावसामुळे चक्क एक मगर विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर प्रकट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडालीये.

मध्यंतरी तलावात मगरींची संख्या प्रचंड वाढली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पवई तलाव हे मगर उद्यान म्हणून विकसित करावे अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close